कोरोना संसर्गाने फेब्रुवारी महिन्यापासून आपले हातपाय पुन्हा फैलवण्यास सुरूवात केली असून, कारंजा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. कारंजा तालुक्यात मागील पंधरा दिवसा ३१० जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले असून त्यातील ७८ जणांवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात, तर ९६ जणांवर गृह विलगीकरणा उपचार केले जात आहेत. उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचा आरोप बाधित रूग्णांनी केला असून दरदिवशी केवळ दोन गोळ्या दिल्या जातात. शिवाय रूग्णांची कोणत्याही प्रकारची तपासणी केल्या जात नाही. शिवाय गृहविलगीकरणात उपचार घेण्यासाठी एका तपासणीच्या नावाखाली तालुक्यातील धनज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार रूपये , तर कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दीड हजार रूपये घेतल्या जात असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. उपचारासाठी प्रशासनाने जबरदस्तीने दाखल केलेल्या रूग्णात काही शेतकरी तर काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असून त्यांना अकरा दिवस सुट्टी होत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडल्याची, तर विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येत नसल्याने अडचण होत असल्याची ओरड सुध्दा उपचार घेणाऱ्या बाधित रूग्णांकडून केल्या जात आहे. या संदर्भात उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ. नथ्थुराम साळुंखे
यांच्याशी संपर्क साधला असता लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या रूग्णांना एक ट्रिटमेंट केल्या जात असून त्यांना ॲजीथ्रोमायसीन, पॅरासिटॅमॉल, मल्टीव्हिटॅमीन व झींक हे घटक असणाऱ्या गोळ्या दिल्या जात असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी व जिल्हा प्रशासनाने सदर प्रकाराची चैाकशी करण्याची गरज आहे.