शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: June 12, 2014 21:36 IST

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव देशभर दिसून आला असला तरी, कारंजा विधानसभा मतदारसंघ या परिस्थितीला अपवाद होता.

वाशिम: लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव देशभर दिसून आला असला तरी, कारंजा विधानसभा मतदारसंघ या परिस्थितीला अपवाद होता. भाजप-सेना युतीसाठी ही चिंतेची बाब असली तरी, मतदारसंघाचे समीकरण वेगळेच असल्याने विजयाचा मार्ग कुणासाठीही सोपा नाही. परिस्थिती कितीही गोंधळाची असली, तरी प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे.कारंजा विधानसभा मतदारसंघातून १९८0 पासून वाशिमचे रामकृष्ण राठी, रिसोडचे अनंतराव देशमुख, अकोल्याचे गुलाबराव गावंडे आणि बाबासाहेब धाबेकर , वाशिमचे राजेंद्र पाटणी हे निवडून आले. २00९ च्या निवडणुकीत कारंजा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे प्रकाश डहाके, शिवसेना-भाजप युतीचे राजेंद्र पाटणी, अपक्ष सुभाष ठाकरे आणि भारिप-बमसंचे डॉ.सुभाष राठोड या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत स्थानिक उमेदवाराचा मुद्दा प्रभावी ठरून राकाँचे प्रकाश डहाके ३0,३७५ मताधिक्याने निवडून आले. एप्रिल २0१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला कारंजा मतदारसंघात ६४,८८९, काँग्रेस-राकाँ आघाडीला ६0,९२७, बहुजन समाज पार्टीला ५,९८९ तर मनसेला २,४९८ मते मिळाली. शिवसेना-भाजप युतीला येथून अवघे ३,९६२ मताधिक्य मिळाला. युतीसाठी हा चिंतेचा विषय आहे.विधानसभा निवडणुकीसाठी राकॉंकडून प्रकाश डहाके, सुभाष ठाकरे आणि जयकिसन राठोड हे इच्छूक आहेत. शिवसेनेतही इच्छकांची रांग मोठी असून, त्यात डॉ.सुभाष राठोड, माजी आमदार गजाधर राठोड यांचे पुत्र अनिल राठोड, जि.प.सदस्य रणजित जाधव, दिनेश राठोड, सूर्यप्रकाश दहात्रे इच्छूक आहेत. हा मतदारसंघ भाजपसाठी सुटल्यास नरेंद्र गोलेच्छा आणि सुरेश लुंगे हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसला मतदारसंघ सुटल्यास माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील ,ज्योती गणेशपुरे इच्छूक आहेत. माजी आमदार राजेंद्र पाटणी हे अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. राजेंद्र पाटणी मैदानात उतरले तर निवडणूक चुरशीची ठरणार आहे.