वाशिम : शासनाचे गलेलठ्ठ वेतन उचलणारे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कर्तव्य बजावताना कामचुकारपणा कसे करतात, याचे इरसाल नमुने ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने चव्हाट्यावर आणताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश खाडे यांनी तातडीने वैद्यकीय अधिकार्यांची बैठक बोलावून सर्वांना वेळेवर हजर राहण्याच्या सूचना देतानाच, कर्तव्याच्या वेळी इतरत्र फेर्यावर न जाण्याची ताकीदही दिली. आता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निर्देशांची अंमलबजावणी कशी होते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. ह्यलोकमतह्ण वृत्तानंतर तीन दिवस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व कक्ष व अधिकारी-कर्मचार्यांनी वेळेच बंधन पाळल्याचे दिसून आले. जिल्हा सामान्य रुग्णालय उघडण्याची वेळ सकाळी ८.३0 ते दुपारी १२.३0 आणि सायंकाळी ४ ते ६ अशी आहे. मात्र, सकाळचे कर्तव्य शक्यतोवर ९.३0 वाजतानंतर आणि सायंकाळचे सत्र ४.३0 वाजतानंतर सुरू होत असल्याने रुग्णांच्या गैरसोयीत अधिकच भर पडत होती. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर कचरा व घाणीचे साम्राज्यही रुग्णांचा ह्यतापह्ण वाढविण्यास पुरेसा ठरत होता. या पृष्ठभूमीवर ह्यलोकमतह्णने जिल्हा सामान्य रुग्णालयाचे ह्यपोस्टमार्टमह्ण करून अनागोंदी कारभार उजागर केला होता. याची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खाडे यांनी बैठक घेऊन उपरोक्त निर्देश दिले आहेत.
सामान्य रुग्णालयातील सर्व कक्षांचे दरवाजे उघडले !
By admin | Updated: May 12, 2014 23:21 IST