संतोष वानखडे /वाशिम: घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम.. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण.. योग्य मार्गदर्शनाचा अभाव.. अशा विपरीत परिस्थितीतून आलेला ग्रामीण भागातील युवक परदेशात ह्यविविध आजारांचा शोध एका चिपमध्येह्ण या विषयावर संशोधन करणार आहे. वाशिम तालुक्यातील खरोळा येथील ङ्म्रीकांत दशरथ वारकड असे या युवकाचे नाव असून, त्याच्या गुणवत्तेची दखल दक्षिण कोरियातील हॅलम विद्यापीठाने घेऊन संशोधनासाठी बोलावले आहे. श्रीकांतचे वडील एका शाळेवर लिपिक म्हणून कार्यरत आहेत. खरोळा येथे शिक्षणाची सुविधा नसल्याने श्रीकांतचे प्राथमिक शिक्षण धानोरा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. धानोरा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बारावीचे शिक्षण वाशिम येथे घेतले. चिखली येथून बी.फार्म. आणि यवतमाळ येथून एम.फार्म. केल्यानंतर श्रीकांतने काही दिवस गावातच वास्तव्य केले. गावात आल्यानंतर श्रीकांतची बुद्धिमत्ता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. पुणे येथील नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट बेसिक आयुर्वेदिक सायन्स येथे संशोधन करण्यासाठी जाण्याची इच्छा त्याने वडिलांजवळ व्यक्त केली. वडिलांनी कोणताही आटापिटा न करता श्रीकांतला पुणे येथे संशोधनासाठी पाठविले. ङ्म्रीकांत पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा या संशोधन संस्थेमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणावर संशोधन प्रकल्प तयार करीत असताना, त्याला मित्रांकडून दक्षिण कोरियातील हॅलम विद्यापीठातील संशोधन कार्याबद्दलच्या फेलोशिपची माहिती मिळाली. श्रीकांतने केवळ पहिला प्रयत्न म्हणून हॅलम विद्यापिठाकडे ऑनलाइन अर्ज केला. संशोधनासाठी 'बायोचिप डिझायनिंग फॉर डिसिज डायग्नोसिस' हा विषय निवडला. आजारांचा शोध घेणे, कोणता आजार आहे हे एका चिपमध्ये समजेल, असे संशोधन करण्याचा मानस श्रीकांतने व्यक्त केल्यानंतर त्याची ऑनलाइन मुलाखत घेण्यात आली. चर्चेअंती हॅलम विद्यापीठाने संशोधनासाठी हिरवी झेंडी दिली. सदर विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्यासाठी श्रीकांतची तीन वर्षीय संशोधन अभ्यासक्रमाकरिता निवड झाली असून, या संशोधनाकरिता आकर्षक फेलोशिपही मंजूर केली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या युवकाने परदेशात वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याचा मान मिळविणे ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
आकाशी झेप घे रे पाखरा!
By admin | Updated: September 28, 2015 02:12 IST