शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

१0 महिन्यानंतर ‘अवकाळी’ मदत

By admin | Updated: February 16, 2016 01:33 IST

१.२२ कोटी रुपये प्राप्त; २0१५ च्या गारपिटीत ८६४ हेक्टर क्षेत्र बाधित.

संतोष वानखडे /वाशिम: ८ ते १६ एप्रिल २0१५ दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील ९४ गावातील ८६४ हेक्टरवरील पिकांवर ह्यपाणीह्ण फेरले होते. १0 महिन्यानंतर आता भरपाईची १ कोटी २२ लाख १८ हजार ३१0 रुपयांची रक्कम वाशिम जिल्ह्यात धडकली आहे. दुसरीकडे डिसेंबर २0१४ ते जानेवारी २0१५ या महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीच्या रकमेची शेतकर्‍यांना प्रतीक्षाच आहे. अवेळी पाऊस व गारपिटीमुळे ८ ते १६ एप्रिल २0१५ दरम्यान पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ३३ टक्क्यापेक्षा अधिक बाधित क्षेत्राला शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार आहे. कोरडवाहू शेतीस हेक्टरी ६८00 रुपये, ओलित हेक्टरी १३५00 तर बहुवार्षिक फळपिकांकरिता १८ हजार रुपये हेक्टरी मदत ह्यराज्य आपत्ती प्रतिसाद निधीह्णच्या सुधारित दरानुसार देण्यात येणार आहे. रिसोड तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्रफळ १0८.५८ हेक्टर आहे. ४२ गावातील ३७८ शेतकर्‍यांचे १0८.५८ हेक्टर क्षेत्रफळावरील कांदा बियाण्याचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. मंगरुळपीर तालुक्यात ३३ टक्क्यापेक्षा अधिक बाधित क्षेत्रफळ १३0.८३ हेक्टर होते. ३३ गावातील २६८ शेतकर्‍यांचे १३0.८३ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कांदा बियाणे ४५.६५, भाजीपाला २५.८८ व फळपिके ५९.३0 हेक्टरवरील पिकांचा समावेश होता. ५0 टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्रामध्ये वाशिम, मालेगाव, रिसोड व मंगरुळपीर तालुक्यातील पिकांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील ९८.५ हेक्टरवरील पिके बाधित असून, २५0 शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. यामध्ये मूग २४ हेक्टर, भाजीपाला ७३ हेक्टर, फळपिके १.५ हेक्टर अशी पिकांची हेक्टरनिहाय विभागणी आहे. मालेगाव तालुक्यातील २२१.४४ हेक्टरवरील पिके बाधित असून ३८६ शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. यामध्ये मूग ९५.९३ हेक्टर, भाजीपाला १३.0८ हेक्टर, फळपिके २0.२५ हेक्टर, कांदा बियाणे ७४.२६, पपई 0.२0, टरबूज ८.६२, फळपिके ३.५0 व इतर पिके ५.६0 अशी पिकांची हेक्टरनिहाय विभागणी आहे.