शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वी देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:38 IST

वाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देबँक खात्याची पडताळणी पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती बँकेचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संबंधित यंत्रणेला प्रशिक्षणही देण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची यादी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडे देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील शेतकर्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्यानंतर राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. शासनाने दीड लाख रुपयांची र्मयादा घालून सरसकट कर्जमाफी दिली. कर्जमाफीसाठी वाशिम जिल्ह्यात एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले आहेत; पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता नसलेल्या गावांत चावडी वाचन घेण्यात आले. आता ग्राम पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याने उर्वरित २७३ गावांत चावडी वाचन सुरू केले जाणार आहे. तत्पूर्वी अचूक असलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी केल्यानंतर आता त्या संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पात्र शेतकरी घेतले असून, या शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी सुरू केली आहे. बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वी या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जवळपास ५0 हजार शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. ही यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली जाणार असून, मंजुरी मिळताच या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाल्यानंतर ते नव्याने रब्बी किंवा खरीप पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत, खासगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक असे मिळून एकूण १ लाख ६४ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, दुसर्‍या टप्प्यात या शेतकर्‍यांची यादी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केली जाणार आहे. येथे पडताळणी केली जाणार असून, पडताळणीअंती अचूक यादी तयार होईल. साधारणत: दिवाळीनंतर दुसरा टप्पा सुरू होणार असून, अर्जात किरकोळ त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. 

कर्जमाफीसंदर्भात अचूक अर्ज असणार्‍या पात्र शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिने कामकाज सुरू आहे. पहिल्या टप्प्यात साधारणत: ५0 हजारच्या आसपास शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे.- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, वाशिम