वाशिम, दि. १६- मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ह्यमागेल त्याला शेततळेह्ण या योजनेचे उद्ष्टि पूर्ण करण्यासाठी प्रशासन आटापिटा करीत आहे. या योजनेत मिळणार्या अनुदानाच्या दुप्पट खर्च शेतकर्यांना करावा लागत असल्याचे पाहून अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यात या योजनेला सुरुवात झाल्यानंतर निर्धारि १९00 शेततळय़ांच्या उद्ष्टिांपैकी केवळ १३ फेब्रुवारीपर्यंत केवळ २१0 शेततळी पूर्ण होऊ शकली आहेत. हे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. शेततळय़ाची योजना जाहीर झाल्यानंतर वाशिम जिल्ह्यासाठी सर्वप्रथम १८ शेततळय़ांचे उद्ष्टि निश्चित करण्यात आले, नंतर यामध्ये वाढ करून १९00 शेततळय़ांचे सुधारित उद्ष्टि देण्यात आले. या योजनेत सुरुवातीला शेकडो शेतकर्यांनी अर्ज केले; परंतु वाशिम जिल्ह्याचा भूस्तर असमान असून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवघ्या पाच फुट खोलवरच खडक लागतो. त्यामुळे शेतकर्यांना निर्धारित अनुदानात शेततळय़ांचे खोदकाम करणे शक्य होत नाही. शासनाने शेततळय़ासाठी ५0 हजार रुपये आर्थिक अनुदानाची र्मयादा घालून दिली असताना. अनेक शेतकर्यांना या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक खर्च करून शेततळे तयार करावे लागले. या मुख्य कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेण्यास फारसे उत्सूक नाहीत. त्याशिवाय शेतकर्यांना या योजनेतंर्गत खोदकामाच्या नंतर अनुदान प्राप्त होते. त्यामुळे अनेक शेतकर्यांची इच्छा असताना आणि जमीन शेततळय़ासाठी योग्य असतानाही पैशाअभावी त्यांना याचा फायदा होत नसल्याचेही वास्तव आहे. त्यामुळेच या योजनेत गेल्या १0 महिन्यांत केवळ २१0 शेततळी पूर्ण होऊ शकली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील ५२, मंगरुळपीर ४४, कारंजा ३९, रिसोड ३२, वाशिम २८ आणि मानोरा तालुक्यातील १५ शेततळय़ांचा समावेश आहे. आता येत्या ३१ मार्चपर्यंत प्रशासनाला उर्वरित १६९0 शेततळय़ांचे उद्ष्टि पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.जिल्हाधिकार्यांकडून वारंवार आढावाजिल्ह्यातील शेततळय़ांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांच्याकडून वारंवार संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करण्यात येत असून, कृषी विभागाच्या बैठकांचे आयोजन करून शेततळय़ांच्या कामांचा वारंवार आढावा घेण्यात येत आहे. या सर्व प्रयत्नानंतरही शेततळय़ांचे उद्दिष्ट ३१ मार्च २0१७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता मुळीच दिसत नाही. मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकर्यांच्या फायद्याचीच आहे. शासनाने यासाठी पूर्ण खर्च देण्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे खर्चाबाबत आपण काहीच बोलू शकणार नाही. शेतकर्यांचे हजारो अर्ज आमच्याकडे आले आहेत. ३१ मार्चपर्यंतच्या निर्धारित मुदतीत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. -दत्तात्रय गावसानेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी वाशिममागेल त्याला शेततळे योजनेत आम्ही शेततळे खोदले आहे; परंतु यासाठी आम्हाला एक लाखाहून अधिक खर्च लागला. शासनाने दिलेल्या अनुदानात शेततळे पूर्ण करणे मुळीच शक्य नाही. या योजनेचे अनुदान शासनाने वाढवावे, तसा निर्णय झाल्यास हजारो शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन आपला विका साधू शकतील. -अमोल वानखडे शेतकरी शेलू. खु. (वाशिम)शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळे मंजूर झाल्यानंतर आम्ही कंत्राटदारामार्फत हे काम सुरू केले; परंतु खडकाळ जमीन लागल्याने हे काम परवडत नसल्याचे सांगून त्याने अध्र्यावरच काम सोडले आणि आपल्या कामाचे पैसे घेतले. त्यानंतर स्वत:जवळचे पैसे खर्चून मला शेततळे पूर्ण करावे लागले. दीड लाख रुपयांपर्यंत मला खर्च करावा लागला. खर्चामुळे शेतकरी या योजनेचा फायदा घेण्यास मागेपुढे पाहत आहेत.-रवि चव्हाण शेतकरी उकळी पेन (वाशिम)
शेततळय़ांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाचा आटापिटा
By admin | Updated: February 16, 2017 23:24 IST