शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गौण खनिजप्रकरणी कारवाई

By admin | Updated: December 9, 2015 02:47 IST

दोन पावत्यांची पडताळणी; रेती चोरीचे मराठवाडा कनेक्शन.

वाशिम : अवैध गौण खनिजप्रकरणी वाशिम तहसील कार्यालयाने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात जवळपास १५ वाहनांविरूद्ध कारवाई करून ६0 हजारापेक्षा अधिक दंड वसूल केला. दरम्यान, ७ डिसेंबरला दोन वाहने ताब्यात घेतली असून, चालकांची चौकशी सुरू आहे. कागदपत्र व पावत्यांची पडताळणी केल्यानंतर कारवाईची दिशा निश्‍चित होणार आहे. जिल्ह्यात रेतीघाट लिलाव बंद असतानाही गौण खनिजाची अवैध व चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. मराठवाड्यातून रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यात रेती मोठय़ा प्रमाणात येत आहे. वाशिम तहसील कार्यालयाने गत सव्वा महिन्यात अवैध गौण खनिजप्रकरणी जवळपास ६0 हजाराचा दंड वसूल केला. रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याच्या संशयावरून ७ डिसेंबरला एमएच ३७ बी ७९३ आणि एमएच 0४ सीए २८२६ या दोन क्रमांकाचे ट्रक तहसील कार्यालयात लावण्यात आले. संबंधितांना रेतीची पावती व आवश्यक कागदपत्रे दाखविण्याची मागणी केली. पावती आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कारवाईची दिशा निश्‍चित होणार आहे. सेनगाव तहसील कार्यालयांतर्गत रेतीसाठय़ाची अधिकृत पावती असल्याचा दावा संबंधितांनी केला. या पावतीची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पावती अधिकृत असेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. मात्र, पावती बनावट असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई होण्याचे संकेत आहेत. चोरीच्या रेती वाहतुकीचे ह्यमराठवाडा कनेक्शनह्ण समोर येत आहे. दरम्यान, अवैध गौण खनिजप्रकरणी कोणतेही वाहन तहसील कार्यालयाने पकडल्यास यापुढे उपविभागीय अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय ते सोडता येणार नाही. त्यामुळे कारवाईची मोहीम अधिक तीव्र होत असल्याचे दिसते.