शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अभय योजनेतून मिळणार वीज बिलात पाच टक्के सूट!

By admin | Updated: November 7, 2016 02:46 IST

व्याज व दंड १00 टक्के माफ; ३0 एप्रिल २0१७ पर्यंत योजना लागू.

वाशिम, दि. ६- विजेची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महावितरणने अभय योजना अमलात आणली असून, मूळ बिलात पाच टक्के सूट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १00 टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. वाढलेल्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ३१ मार्च २0१६ व त्याआधीच्या कृषी व पाणीपुरवठा वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्वांंसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. यांतर्गत योजना लागू झाल्यापासून एका महिन्याच्या आत जे ग्राहक योजनेचा फायदा घेऊन देयक अदा करतील, त्यांना मूळ थकबाकीच्या केवळ ९५ टक्केच रक्कम अदा करावी लागणार आहे. थकबाकीवर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड यामध्ये १00 टक्के सूट, तर मूळ थकबाकीमध्ये पाच टक्के सूट दिली जाणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २0१७ या कालावधीमध्ये योजनेत सहभाग घेणार्‍या ग्राहकांना १00 टक्के दंड व व्याजापासून मुक्ती मिळणार आहे. १ फेब्रुवारी २0१७ ते ३0 एप्रिल २0१७ या कालावधीत योजनेत भाग घेणार्‍या ग्राहकांना व्याजातून ७५ टक्के सूट मिळणार असून, मूळ थकबाकी आणि योजनेत सहभागी होईपर्यंतच्या तारखेपर्यंंत लागणारे २५ टक्के व्याज भरावे लागणार आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांनी देयक अदा करून पूर्ववत वीजपुरवठा सुरू करावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. वाशिम जिल्हय़ात महावितरणचे एकंदरीत २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक आहेत. त्यात घरकुती ग्राहकांची संख्या १ लाख ५२ हजार ८८६ आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंंत या ग्राहकांपैकी थकबाकीदार ग्राहकांकडे १९.४५ कोटी रुपये थकबाकी होती. त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमधून मुक्ती मिळवायला हवी.- अतुल देवकर, उपअभियंता, महावितरण, वाशिम