शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

९७ हजार निराधारांना ‘आधार’; प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:41 IST

वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने निराधारांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या ...

वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने निराधारांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार जिल्ह्यातील ९७ हजार ६३८ निराधारांना एक हजार रुपयांचा आधार मिळणार आहे.

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली. मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, निराधार आदींना थोडाफार दिलासा म्हणून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आदी योजनेंतर्गत असलेल्या निराधार लाभार्थींसाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याचा लाभ जिल्ह्यातील ९७ हजार लाभार्थींना होणार आहे.

०००००

कोट बॉक्स

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. या दरम्यान निराधारांची परवड होईल. शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा करून थोडाफार दिलासा आहे.

- आशा श्रीवास्तव

०००

संचारबंदीमुळे असल्याने निराधार नागरिकांची गैरसोय होणार आहे. शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने यामधून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल. एक हजार रुपये केव्हा मिळतात, हे अद्याप निश्चित नाही.

- कमलाबाई आलमवार

०००

कोरोनामुळे सर्वांचेच जगणं कठीण झाले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रोजगारही नाही. त्यामुळे शासनाने निराधारांना किमान दोन हजार रुपये देणे अपेक्षीत होते.

- नंदा वाघ

०००

कोरोना विषाणू संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाने एक हजार रुपये देण्याची घोषणा करून निराधार लाभार्थींना थोडाफार दिला आहे.

- गयाबाई शिंदे

००

एक हजार रुपये देण्याची घोषणा करून शासनाने निराधारांना आधार देण्याचा प्रयत्न केला. निराधारांचे मानधन दरमहा एक तारखेला मिळेल, अशीही व्यवस्था करावी.

- आशाबाई पवार