शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणुकीत ९९ टक्के मतदान

By admin | Updated: September 7, 2015 01:37 IST

वाशिम बाजार समिती मतदान शांततेत, सोमवारी मतमोजणी.

वाशिम : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ९८.५५ असून, २४८४ पैकी २४४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाशिम बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी एकूण ३९ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले होते. २ हजार ४४८ मतदार असलेल्या या निवडणूकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण -७, महिला -२, इतर मागासप्रवर्ग -१, व्हीजेएनटी-१ अशा एकूण ११, ग्राम पंचायत मतदार संघात सर्वसाधारण -२, अनुसुचित जाती जमाती- १, आर्थिक दुर्बल घटक -१ अशा एकूण -४, व्यापारी मतदार संघ-२ व हमाल मापारी मतदार संघ-१ अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून १५ उमेदवार, ओबीसीमधून तीन, सर्वसाधारण महिला चार, विजा, भजमधून दोन उमेदवार, ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून चार उमेदवार, ग्रामपंचायत एस.सी. एस.टी. प्रवर्गातून दोन उमेदवार, ग्रामपंचायत दुर्बल घटकातून दोन उमेदवार, अडते, व्यापारी प्रवर्गातून चार उमेदवार आणि हमाल मापारी प्रवर्गातून तीन उमेदवार असे एकूण ३९ उमेदवार निवडणुकीत उभे होते. व्यापारी -अडते मतदारसंघात २१२ पैकी २00 मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९४ आहे. हमाल-मापारी मतदारसंघातून ३८५ पैकी ३८२ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.२२ आहे. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११८८ पैकी ११८२ मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी ९९.४९ आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून ६९९ पैकी ६८४ मतदारांनी मतदान केले असून, टक्केवारी ९७.८५ आहे. वाशिम बाजार समितीच्या निवडणुकीत एका बाजूने आजी-माजी आमदार तर दुसर्‍या बाजूने माजी सभापती नारायणराव गोटे व प्रभाकर लांडकर यांच्या पॅनलमध्ये टस्सल झाली. या कोण बाजी मारणार, हे सोमवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.