शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

८६ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 15:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत गेल्या १५ दिवसांत ४ हजार ९५७ टोकणधारक शेतकºयांची  ८६ हजार ३३३ क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रांवर ११ आॅगस्टपर्यंत मोजण्यात आली आहे. अद्यापही ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात तुरीचे मोठ्या ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील शासकीय खरेदी साडे नऊ हजार टोकण शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत गेल्या १५ दिवसांत ४ हजार ९५७ टोकणधारक शेतकºयांची  ८६ हजार ३३३ क्विंटल तूर शासकीय खरेदी केंद्रांवर ११ आॅगस्टपर्यंत मोजण्यात आली आहे. अद्यापही ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. 

गतवर्षीच्या खरीप हंगामात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु अपेक्षीत भाव मिळत नसल्याने तूर उत्पादक शेतकºयांत नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे सुरुवातीलाच राज्य शासनाने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत हमी भावाने शासकीय तूर खरेदी सुरू केली. या तूर खरेदीदरम्यान विविध अडचणी आल्यामुळे तरू मोजणीत खोळंबा होऊन अनेक शेतकºयांना टोकण देऊनही त्यांची तूर मोजणे ३१ मे पर्यंतच्या निर्धारित मुदतीत शक्य झाले नाही. अशाच टोकणधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ जुलै रोजी निर्णय जारी करून टोकणाधारक शेतकºयांची तूर ३१ आॅगस्टपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मोजून घेण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात तूर मोजणी शिल्लक असलेल्या १४ हजार ५४२ टोकणाधारक शेतकºयांची तूर मोजून घेण्यात येत आहे. गेल्या २० दिवसांत जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीरआणि कारंजा या सहाही केंद्रांवर ४ हजार ९५७ टोकणधारकांची ८६ हजार ३३३ क्विंटल तूर मोजण्यात आली आहे. आता उर्वरित १५ दिवसांत प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत शिल्लक असलेल्या ९ हजार ५८५ टोकणधारकांची १ लाख ९८ हजार २०४ क्विंटल तूर मोजून घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे तूर मोजणीला आणखी वेग देण्याची गरज आहे.