शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

६४१ पैकी ७३ गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:27 IST

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात स्वामित्व योजनेअंतर्गत सर्व गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४१ ...

वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात स्वामित्व योजनेअंतर्गत सर्व गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ६४१ पैकी ७३ गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

स्वामित्व योजनेअंतर्गत राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील जमिनीचे जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण व भूमापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. या नकाशातील मिळकतींना (जीआयएस डाटा) ग्रामपंचायतीमधील मिळकत रजिस्टर जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आणि मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गावस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील. त्यामुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल. मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. त्यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

००००००

मिळकत पत्रिका तयार होणार

गावठाण मोजणीमुळे मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावण्यास मदत होईल. ग्रामपंचायतीला गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. त्यामुळे नियोजन करण्यास सोय व सुलभता निर्माण होईल.

०००

ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ता कराच्या व्याप्तीत येतील. त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल. ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्र (नमुना-८) आपोआप तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज, सुलभ व पारदर्शक होईल. गावठाण हद्दीतील ग्रामपंचायत, शासनाच्या सार्वजनिक व प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होणार असल्याने गावठाणातील मिळकतीच्या हद्दी व क्षेत्राचे वाद कमी होतील.