शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ जयंतीनिमित्त ६०० किमी ‘सायकल वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST

वाशिम सायकलस्वार ग्रुप व वाशिम रांदीनियर ग्रुप, सायकलस्वार हे सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, आरोग्याचा संदेश देत आहे. ९ ...

वाशिम सायकलस्वार ग्रुप व वाशिम रांदीनियर ग्रुप, सायकलस्वार हे सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, आरोग्याचा संदेश देत आहे. ९ ते १२ जानेवारीदरम्यान आयोजित सायकल ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून २० सायकलस्वारांनी वाशिम-पांढुर्णा (मध्य प्रदेश) असे ६०० किमीचे अंतर कापले. यापैकी १४ सायकलस्वारांनी ४० तासांचे निर्धारित अंतर १ तासाआधीच पूर्ण केले. या स्पर्धेचा प्रारंभ ९ जानेवारी रोजी पाटणी चौक येथून पहाटे ४ वाजता झाला. या स्पर्धेत २० जणांनी सहभाग घेतला होता. मंगरूळपीर, कारंजा, अमरावती, मोर्शी, वरुड, पांढुर्णा (मध्य प्रदेश) सावनेर व परत वाशिम अशी ही सायकल वारी होती. मोहीम समाप्तीनंतर वाशिम येथे आदेश कहाते, दीपक एकाडे, नगरसेवक राहुल तुपसांडे, अ‍ॅड. नंदकिशोर पाटील, डॉ. भरत सातपुते यांच्यासह मान्यवरांनी सायकलस्वारांचे स्वागत केले. या स्पर्धेत सहभागी ९ युवक सुपर रांदीनियर पदकाचे मानकरी ठरले आहेत. पुढील १०० कि.मी.ची ब्रेवेट पॉप्युलर स्पर्धा १७ जानेवारी रोजी वाशिम येथे होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गेल्या ५ वर्षांपासून चेतन शर्मा हे वाशिम रांदीनियर ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबवित आहेत.