शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

४९१ ग्रा.पं.चे ‘रेकॉर्ड’ जि.प.च्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:01 IST

चार दिवस चालणार तपासणी : जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर सहा पथकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ (अभिलेख) अद्ययावत राहत नसल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील एकूण ४९१ ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ जुलैपासून सुरू होणारी तपासणीची ही मोहीम २१ जुलैदरम्यान चार दिवस चालणार आहे. वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, विविध वित्त आयोगांतर्गत तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनातर्फे लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना पुरविला जातो. याशिवाय स्थानिक पातळीवरील विविध करांचा पैसादेखील विकास कामांसाठी उपयोगी पडतो. या सर्व निधींचा लेखाजोखा ग्रामपंचायतींनी अद्ययावत ठेवणे अपेक्षित आहे. लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड (अभिलेखे) उपलब्ध असणेही आवश्यक असते. तथापि, काही ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत राहत नाही तर काही ग्रामपंचायती रेकॉर्ड सादरच करीत नसल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात आली आहे. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड अद्ययावत राहत नसल्याने लेखा परीक्षणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आक्षेप घेण्यात येतात तसेच काही ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड तपासणीस वेळेवर उपलब्ध होत नाही. पर्यायाने ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होतात. यावर तोडगा म्हणून तसेच ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनाने १८ जुलैपासून रेकॉर्ड तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी सहाही पंचायत समिती स्तरावर विशेष पथकांचे गठण केले आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, मिनी बीडीओ, विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पंचायत समितीचे पथक हे दुसऱ्या पंचायत समितींतर्गतच्या ग्राम पंचायतींच्या रेकॉर्डची पाहणी व तपासणी करणार आहे. पंचायत समिती स्तरावरील सभागृहात संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे १८ ते २१ जुलै दरम्यान ग्रामपंचायतच्या रेकॉर्डसह उपस्थित राहणार आहेत. अशी राहील ग्रामपंचायतींवरील कार्यवाहीची दिशा!रेकॉर्ड तपासणीला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड ३० जूनपर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या होत्या. सदर रेकॉर्ड उपलब्ध करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविली होती. आता सदर रेकॉर्ड उपलब्ध झाल्याचे गृहित धरून पंचायत समिती स्तरावर येऊन विशेष पथकातर्फे चार दिवस तपासणी केली जाणार आहे. पंचायत समितीच्या सभागृहात सर्व ग्राम पंचायतीचे रेकॉर्ड, दप्तर घेऊन संंबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व मिनी गटविकास अधिकारी यांची सभा घेतली जाणार आहे. यावेळी रेकॉर्ड तपासणी केली जाणार आहे. रेकॉर्ड सादर न करणाऱ्यांवर कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.ग्रामपंचायतींचे ‘रेकॉर्ड’ (अभिलेख) अद्ययावत असणे गरजेचे आहे. काही ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत राहत नसल्याचे रेकॉर्ड अद्ययावत कसे ठेवावे, यासह इतर महत्त्वाची माहिती देण्यासाठी १८ जुलै ते २१ जुलै दरम्यान पंचायत समिती स्तरावर मोहीम राबविली जाणार आहे.- प्रमोद कापडेउपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम.