शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

६३ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी हवे ३.७७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST

शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांंतर्गत शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस प्रत्येकी ...

शासनाकडून सर्व शिक्षा अभियानांंतर्गत शाळेतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस प्रत्येकी दोन मोफत गणवेश वाटप करण्यात येतात. या गणवेशाचे अनुदान शाळेच्या खात्यावर जमा केले जाते. या अनुदानातून विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने प्रति विद्यार्थी दोन गणवेश खरेदी करून वितरित केले जातात. या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ६२,९०१ विद्यार्थी असून, या सर्वांना प्रत्येकी दोन गणवेश वितरित करण्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४९ हजार ६०० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शिक्षण विभागाने ही मागणी शासनाकडे नोंदवली असून, अद्याप निधी प्राप्त झाला नाही.

-----------

दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांची मागणी

सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेंतर्गत दोन गणवेशांकरिता प्रति गणवेश २०० रुपयांप्रमाणे ४०० रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात येतो. त्यात दोन गणवेशांची खरेदी करणे अशक्य आहे. यामुळे अनेकदा शिक्षक, मुख्याध्यापकांना पदरचे पैसे खर्च करून राहिलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करून द्यावे लागले. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी जि. प. शिक्षण विभागाकडून प्रति गणवेश ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

--------------

कोट:

सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश वितरित करण्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४९ हजार ६०० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या निधीची मागणी वरिष्ठस्तरावर नोंदविण्यात आली असून, निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

-गजाननराव डाबेराव

प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथ),

जि. प. वाशिम

------------

बॉक्स:

१) एकूण पात्र विद्यार्थी - ६२,९०१

२) एकूण मागणी - ३,७७,४९,६००

बॉक्स:

प्रवर्गनिहाय विद्यार्थी व निधीची मागणी

१) सर्व मुली - ३७,०२३

२) एससी मुले - ८,३०१

३) एसटी मुले - ३,५७९

४) बीपीएल मुले -१३,९९८