शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

३७३ हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्सनी लसीचा पहिला डोस घेतलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:28 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात असताना, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात असताना, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे. ७३ हेल्थ केअर वर्कर्स आणि ३०० फ्रंटलाइन वर्कर्स अशा एकूण ३७३ जणांनी लसीचा पहिला तर ९५०६ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.

देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण ७,१४३ जणांना तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत ३२ हजार जणांना कोरोना संसर्ग झाला. कोरोनावर एकमेव व प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स, १२ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. ८,३४३ हेल्थ केअर वर्कर्सने लसीकरणासाठी नोंदणी केली असून, यापैकी ७३ जणांनी पहिला तर २,६३२ जणांनी ११ जुलैपर्यंत दुसरा डोस घेतला नाही. १६ हजार १५२ फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी झाली असून, यापैकी ३०० जणांनी पहिला तर ६,८७४ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.

०००००००००००

बॉक्स

दुसऱ्या डोसबाबत उदासीनता?

हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांचे लसीकरण सुरू होऊन जवळपास पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या नगण्य असली तरी दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या दखलपात्र ठरत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर अद्याप ९,५०६ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.

०००००००००००

कोट बॉक्स

कोरोनावर प्रभावी व एकमेव उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ज्या हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी शक्य तेवढ्या लवकर लसीचा डोस घ्यावा.

- डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

००००००००००००००

प्रकारनोंदणीपहिला डोसदुसरा डोस

हेल्थ केअर वर्कर्स ८३४३ ८२७० ५६३८

फ्रंटलाइन वर्कर्स १६१५२ १५८५२ ८९७८

०००००००००००००

लस न घेतलेले हेल्थ केअर वर्कर्स ७३

लस न घेतलेले फ्रंटलाइन वर्कर्स ३००