जानेवारी महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. २६ जानेवारी रोजी नऊ जणांचा, तर २७ जानेवारी रोजी २५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, सुंदरवाटिका येथील १, पोलीस स्थानक परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, काळे फाईल येथील ४, तिरुपती सिटी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, तोंडगाव येथील १, बाभूळगाव येथील २, अडोळी येथील १, जांभरूण महाली येथील १, सुरकंडी येथील १, वारा येथील १, कारंजा शहरातील सुदर्शन कॉलनी येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, रिसोड शहरातील १, मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील १, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील १ यासह अन्य नऊ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता ७,०६२ वर पोहोचला आहे. गत दोन दिवसात ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,७६८ जणांनी कोरोनावर मात केली.