शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३३ प्रकल्प काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST

जिल्ह्यात लघू पाटबंधारे अंतर्गत १३७ प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहेत. यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित ...

जिल्ह्यात लघू पाटबंधारे अंतर्गत १३७ प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहेत. यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच सुरू केला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परंतु, या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीला मात्र मोठा आधार मिळाला असून, जिल्ह्यातील ३३ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

--------------

एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के साठा

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात समाविष्ट असलेल्या वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाची पातळी वाढल्यामुळे वाशिम शहराच्या पाणी पुरवठ्याची समस्या मिटली आहे.

------------------

मानोऱ्यातील १३ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

जिल्ह्यातील ३३ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले असून, त्यात मानोरा तालुक्यातील १३ प्रकल्पांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील इतर प्रकल्पांची स्थिती चांगली असून, या तालुक्यातील एकूण २५ प्रकल्पांत मिळून ८६.५८ टक्के जलसाठा झाला आहे.

----------

शंभर टक्के भरलेले प्रकल्प

तालुका - शंभर टक्के पातळीचे प्रकल्प

वाशिम - २

मालेगाव - ८

रिसोड - ३

मंगरुळपीर - ६

मानोरा - १३

कारंजा - १