शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२८ गावे पाणीपुरवठा योजना बंद!

By admin | Updated: June 2, 2017 01:24 IST

नागरिकांचे पाण्यासाठी हाल : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तालुक्याला वरदान असलेली २८ गावे पाणीपुरवठा योजना ३१ मे रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. १ कोटी २७ लाख रुपये पाणी कर थकीत असल्याने जीवन प्राधिकरणने ही योजना बंद केली. त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी १ जून रोजी केली.महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनेच्यावतीने २००९ पासून तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने ही योजना चिरकुटा येथील अरुणावती प्रकल्पावरून सुुरू करण्यात आली होती. मे २०१७ पर्यंत या योजनेचे १ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. याबाबत वारंवार संबंधित गावाच्या सरपंच, सचिव तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सूचित केले; मात्र पाणी कर वसूल करून भरण्यात आला नाही. गावकरी जर पाणी कर भरत नसतील, तर त्याचे दायित्व संबंधित ग्रामपंचायतने घेतले पाहिजे; मात्र तसे झाले नाही. तोट्यात असणाऱ्या या योजनेला बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले. मानोरा नगरपंचायतने रक्कम भरल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा मात्र सुुरू आहे. थकीत रक्कम भरा, अशा सूचना ंदेऊनही रक्कम भरण्यात आली नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनासुद्धा याबाबत कळविण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, विद्यमान आमदार आदींनी याबाबत लक्ष देऊन काहीतरी तडजोड करून योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने टंचाईग्रस्त गावातील महिलांना दुरून पाणी आणावे लागत आहे. नदी, नाले, हातपंप आटल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. संबंधित गावाच्या सरपंच, सचिवांनी पुढाकार घेऊन पाणी कर वसूल करून पैसे भरावे तसेच नागरिकांनीसुद्धा वसुलीसाठी सहकार्य करावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.योजना तोट्यात; चालविणे अशक्य !२८ गावे पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. मे २०१७ पर्यंत एकूण १ कोटी २७ लाख रुपये थकीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने ३१ मे रोजी मध्यरात्रीपासून ही योजना बंद केली आहे. योजना पूर्ववत होण्यासाठी नागरिकांनी पाणी कर भरणे गरजेचे आहे किंवा जिल्हा परिषदेने तडजोड करावी, अशी प्रतिक्रिया प्राधिकरणचे शाखा अभियंता गजानन खराटे यांनी दिली.गव्हा येथे कृत्रिम पाणीटंचाई!मानोरा : तालुक्यातील गव्हा येथे कृत्रीम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी उपलब्ध असूनही नदीच्या उत्तरेकडील नागरिकांना नियोजनाअभावी पाणी मिळत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे बुधवारी केली. वॉर्ड क्रमांक १ व २ मधील नागरिकांनी निवेदनात नमूद केले, की सार्वजनिक विहिरीवरून अर्ध्या गावाला पाणीपुरवठा केल्या जातो. पाणीटंचाई अंतर्गत विहिरीचे नवीन कामसुद्धा झाले आहे. विहिरीला भरपूर पाणी असूनदेखील ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी नदीच्या उत्तरेकडील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी अनेक वेळा वॉर्ड क्रमांक २ व ३ मधील महिलांनी ग्रामपंचायतच्या मासिक सभेत जाऊन पाणी समस्या सोडविण्याकरिता विनंती केली. दलित वस्तीच्या भागात पाणी मिळणे कठीण झाले आहे, तर समर्थक व जवळच्या नागरिकांना भरपूर पाणी सोडले जाते, असा आरोप नागरिकांनी निवेदनातून केला. या प्रकरणाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली. ग्रामपंचायतीने पाणी कर भरावा, अशी मागणी माजी पं.स. सदस्य यशवंतराव इंगळे यांनी केली आहे.