शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी २.६0 कोटी निधी

By admin | Updated: June 24, 2016 01:27 IST

पहिल्या दिवशी मिळणार गणवेश; पंचायत समितींकडे निधी रवाना.

वाशिम : जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले. निधीचा अडथळा येऊ म्हणून शिक्षण विभागाने ६५ हजार १८२ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी दोन कोटी ६0 लाख ७२ हजार ८00 रुपये संबंधित पंचायत समितींकडे रवाना केले आहेत. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये म्हणून शासन नानाविध उपक्रम अंमलात आणत आहे. वंचित, गोरगरीब व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जातो. दारिद्रय़रेषेखालील मुले, एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील मुले आणि सर्व प्रवर्गातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना मोफत गणवेश पुरविला जातो. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणार्‍या या गणवेशासाठी प्रती विद्यार्थी प्रती दोन गणवेशासाठी ४00 रुपयांचा निधी शासनातर्फे पुरविला जातो. वाशिम जिल्ह्यात एकूण ६५ हजार १८२ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहेत. या गणवेशासाठी दोन कोटी ६0 लाख ७२ हजार ८00 रुपये शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.कारंजा तालुक्यातील ११८८२ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४७ लाख ५२ हजार ८00 रुपये, मालेगाव तालुक्यातील ११९५३ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४७ लाख ८१ हजार २00 रुपये, मंगरुळपीर तालुक्यात ९३१७ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ३७ लाख २६ हजार ८00 रुपये, मानोरा तालुक्यात ८७0४ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ३४ लाख ८१ हजार ६00 रुपये, रिसोड तालुक्यात १0३८७ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४१ लाख ५४ हजार ८00 रुपये, वाशिम तालुक्यात १२९३९ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५१ लाख ७५ हजार ६00 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ६५ हजार १८२ विद्यार्थ्यांंमध्ये दारिद्रय़रेषेखालील १0 हजार ९१९ विद्यार्थी, एस.सी. प्रवर्गातील ९४६६ विद्यार्थी आणि एस.टी. प्रवर्गातील ३७९0 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उर्वरीत सर्व मुली आहेत.