शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

२४ लाखाचे शौचालय अनुदान प्रलंबितच !

By admin | Updated: September 27, 2016 02:30 IST

मानोरा तालुक्यातील २00 लाभार्थींना अद्याप शौचालयाचे अनुदान मिळाले नाही.

वाशिम, दि. २६- नगर पंचायत स्थापनेपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या मानोर्‍यातील २00 लाभार्थींना तातडीने २४ लाखांचे अनुदान वितरण करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी मानोरा गटविकास अधिकार्‍यांना दिले होते. तथापि,अद्यापही या निर्देशांची अंमलबजावणी मानोरा पंचायत समितीने केली नाही.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थीला १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. मानोरा ग्राम पंचायत असताना, शहरातील २00 लाभार्थींनी शौचालय बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आली. दरम्यान, शौचालय अनुदानाची रक्कम कुणी द्यावी? असा प्रश्न निर्माण झाला. नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावी, अशी भूमिका नगर पंचायत प्रशासनाने घेतली. जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मानोरा ग्राम पंचायत असताना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने २00 लाभार्थींचे प्रत्येकी १२ हजार अनुदान याप्रमाणे २४ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावे, अशी भूमिका हेमेंद्र ठाकरे यांनी सर्वसाधारण सभेत मांडली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी चर्चेअंती २00 लाभार्थींसाठी २४ लाखांचे अनुदान आठ महिन्यांपूर्वीच देण्यात आले. तथा िप, अनुदान वितरणास दिरंगाई झाली. यासंदर्भात हेमेंद्र ठाकरे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याशी अनुदान दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. या पृष्ठभूमीवर संबंधित २00 लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करण्याचे निर्देश महेश पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी मानोरा गटविकास अधिकार्‍यांना दिले. तथापि, अद्यापही २00 लाभार्थींना अनुदान मिळाले नाही. पंचायत समिती स्तरावरून प्रचंड दिरंगाई होत असल्याचा फटका सर्वसामान्य लाभार्थींना बसत आहे. सद्या मोठा गाजावाजा करून शौचालय बांधकामासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे, दुसरीकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्यानंतरही लाभार्थींना आठ महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याचे वास्तव मानोरा तालुक्यात आहेत. मानोरा शहरातील २00 लाभार्थींना तातडीने अनुदान वितरित करण्याबाबत पंचायत समिती स्तरावर वारंवार चर्चा केली. तथापि, अद्यापही याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. याविरोधात आवाज उठविणार असून, न्याय न मिळाल्यास लाभार्थीसह आंदोलन करण्याचा इशारा जि.प. सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी दिला आहे.