शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

१.८८ लाख शेतकऱ्यांना मिळतेय प्रत्येकी दोन हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:42 IST

वाशिम : पीएम (प्रधानमंत्री) किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १.८८ लाख शेतकऱ्यांसाठी सातव्या हप्त्याचे प्रत्येक दोन हजार रुपये ...

वाशिम : पीएम (प्रधानमंत्री) किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १.८८ लाख शेतकऱ्यांसाठी सातव्या हप्त्याचे प्रत्येक दोन हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. बँकेतून ही रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकांकडे धाव घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना या योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत समप्रमाणात दिले जाते. वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान पाठविला जातो. आधार कार्ड, बँक खाते, सातबारा उतारा व रहिवाशी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या आधारे संकेतस्थळावर माहिती अपलोड झालेल्या जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या १ लाख ९९ हजार ३३३ आहे. यापैकी जवळपास १२ हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. यंदा कोरोनाच्या काळात मे महिन्यापासून या वर्षातील पहिला हप्ता तर योजना लागू झाल्यापासूनचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. ही रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येते.

000

ूबॉक्स

शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा!

ऐन खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या वेळी दोन हजार रुपये असल्याने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या काळात बँकांमध्ये गर्दी होत असल्याने पैसे काढण्यासाठी जात असताना, शेतकऱ्यांमध्ये कोरोनाची थोडी धाकधूकही आहे. बँकांमधील या गर्दीतून कोरोना संसर्ग तर होणार नाही, अशी भीतीही असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

००००००

कोट बॉक्स

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हजार रुपये संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. बँकेत गर्दी होणार नाही, याचे नियोजन करून बँक खात्यातील पैसे काढावे. प्रत्येकाकडून कोरोनाविषयक नियमाचे पालन झाले, तर इतरांना संसर्ग होणार नाही.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

००००००००००

अशी आहे शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या

तालुकापोर्टल अपलोड संख्याअपात्र

वाशिम ३६८७५ १९८२

मालेगाव ३२४७८ २१२२

रिसोड ३५५८५ ३०४६

मं.पीर ३२७०२ १९९०

मानोरा २७६२८ १७३७

कारंजा ३४०६५ १२२१