शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ‘नो-मास्क’प्रकरणी १.७८ कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

गतवर्षी केंद्र शासनाने कोरोना नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. राज्य शासनानेही मार्च २०२० पासून केंद्र शासनाच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी ...

गतवर्षी केंद्र शासनाने कोरोना नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. राज्य शासनानेही मार्च २०२० पासून केंद्र शासनाच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासह जिल्हा सीमाबंदी आणि इतर प्रतिबंध लावले. त्यात मास्क वापरणे बंधनकारक करून मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार वाशिम पोलिसांनी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली. त्यात २१ मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ दरम्यान वर्षभराच्या कालावधीत ३७,५८२ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ कोटी ७७ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.

-----------

महिनाभरात नो-मास्कप्रकरणी ६५१६ जणांना दंड

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मास्क न लावणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांवर २१ मार्च २०२० पासून सुरू केलेली कार्यवाही मध्यंतरी कोरोना संसर्ग नियंत्रित असताना बंद ठेवण्यात आली होती; परंतु जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मास्क न लावणाऱ्यांवर १८ फेब्रुवारीपासून कारवाई सुरू करण्यात आली. त्यात १८ फेब्रुवारी २०२१ ते १५ मार्च २०२१ दरम्यान महिनाभराच्या काळात ६५१६ लोकांकडून ३२ लाख ५८ हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.

--------------

नियमांच्या उल्लंघनप्रकरणी गुन्हे

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च २०२० पासून नियम लागू केले होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. त्यात २१ मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ पर्यंत २९३० लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

-----------

ट्रिपल सीटच्या १३१६० कारवाया

कोरोना नियंत्रणासाठी मास्क न लावणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करतानाच दुचाकीवर निर्धारित आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळून आल्याप्रकरणीही पोलिसांनी कारवाई केली. त्यात ट्रिपल सीटप्रकरणी १३ हजार १६० दुचाकीचालकांकडून २६ लाख ३२ हजारांचा दंड वर्षभरात वसूल केला.

-------------

कोरोना नियंत्रणातील वर्षभराच्या कारवाया

१) दाखल गुन्हे -२९३०

२) विनामास्क कारवाई -१,७७,९५,९००

३) ट्रिपल सीट कारवाई -१३,१६०

४) मंगल कार्यालय, हॉल कारवाई -०७

---------------------

कोट : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी निर्गमित आदेशाची कठोर अंमलबजावणी पोलिसांनी केली. त्यात वर्षभरात मास्क न लावणाऱ्यांकडून १ कोटी ७७ लाख, ९५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई दंडासाठी नव्हे, तर लोकांना शिस्त लावण्यासाठी आहे. नागरिकांनी स्वत:चा आणि समाजाच्या सुरक्षेचा विचार करून कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.

- वसंत परदेशी,

जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम