शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

१६,१८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा !

By admin | Updated: February 17, 2016 02:09 IST

१८ फेब्रुवारीपासून प्रारंभ; सहा भरारी पथकांचे गठण.

वाशिम : इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील १६ हजार १८१ विद्यार्थ्यांंची त्यासाठी नोंदणी झाली आहे. दरम्यान, कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सहा पथकांचे गठण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेत वाशिम जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन व माध्यमिक शिक्षण विभागाने दक्षता घेतली आहे. वाशिम जिल्ह्यात नियमित १५ हजार ४९८ आणि पुनर्परीक्षार्थी ६८३ असे एकूण १६ हजार १८१ विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सहा भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या नेतृत्वात एक पथक राहणार आहे. याप्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे स्वतंत्र भरारी पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे. परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक व अन्य कर्मचार्‍याच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशिक्षणही देण्यात आले. परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार लक्षात घेता, यावर्षी विशेष पावले उचलली आहेत. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील एकही परीक्षा केंद्र उपद्रवी म्हणून घोषित झाले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा-महाविद्यालयांत पालक-शिक्षक सभा घेऊन कॉपीमुक्त अभियान व बारावीच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्याचा परिणाम बारावीच्या परीक्षावर होणार आहे.