शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींचे अनुदान रखडले

By admin | Updated: September 7, 2015 01:41 IST

सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभापासून वाशिम जिल्ह्यातील १0 हजार शेतकरी वंचित.

वाशिम : अवर्षणप्रवण क्षेत्रात २00५ पासून समाविष्ट करण्यात आलेल्या वाशिम जिल्हय़ामध्ये विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत २0१४-१५ या वर्षात ऑनलाईन अर्ज केलेल्या दहा हजार शेतकर्‍यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी आवश्यक असलेले १५ कोटी १२ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे जिल्हय़ाच्या सिंचन अनुशेषात वाढ होत असून, शेतकर्‍यांना हे अनुदान त्वरेने उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वास्तविक या योजनेच्या पूर्ततेमध्ये वाशिम जिल्हा एक वर्षाने मागे असून गतवर्षीचेचे हे अनुदान रखडलेले आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षात अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांच्या अनुदानाचाही प्रश्न निर्माण होत आहे. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी पिचले आहेत. या शेतकर्‍यांना विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे; मात्र जिल्हय़ातील अर्ज केलेल्या या शेतकर्‍यांना हे अनुदान न मिळाल्याने योजनेंतर्गत जमीन सिंचनाखाली आणण्याच्या उद्दिष्टाला परिणामी खो बसत आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्हय़ातील नऊ हजार ७४६ शेतकर्‍यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यासाठी शेतकर्‍यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. २0१५-१६ हे अर्धे आर्थिक वर्ष उलटून गेल्यानंतरही ते शेतकर्‍यांना मिळालेले नाही. या निधीपैकी पहिल्या टप्प्यात केवळ एक कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान काय ते मिळालेले आहे. मात्र १५ कोटी १२ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही रखडलेले आहे. यामध्ये ठिबक संचासाठी एक हजार ६६४ शेतकर्‍यांना चार कोटी १६ लाख रुपये आणि तुषार संचासाठी (स्प्रिंकलर) आठ हजार ८२ शेतकर्‍यांसाठी १२ कोटी १२ लाख ३0 हजार रुपये असे १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान हवे आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातंर्गत त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर शासनाकडे तसी मागणीही केल्या गेली आहे; मात्र एक कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचे तुटपुंजे अनुदान वगळता अद्याप शासनाकडून निधीच यासाठी दिला गेला नसल्याचे वास्तव आहे.