शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा रद्द ; पण शुल्क परतीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. परीक्षा रद्द झाल्याने ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील १९,७१५ विद्यार्थ्यांना ८१.८१ लाख रुपये परीक्षा शुल्क परत कधी मिळणार? याची प्रतीक्षा लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ आहेत. यामध्ये एकूण १९,७१५ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट १९,७१५ विद्यार्थी पास झाले आहेत. दहावी परीक्षेचे शुल्क ४१५ रुपये असून, १९,७१५ विद्यार्थ्यांनी एकूण ८१ लाख ८१ हजार ७२५ रुपये परीक्षा शुल्क भरले आहे. परीक्षाच रद्द झाल्याने शुल्क परत मिळणे अपेक्षित असून, शुल्क परत केव्हा मिळणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

००

अशी आहे जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा -३६३

दहावीतील एकूण विद्यार्थी : १९,७१५

प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४१५

एकूण परीक्षा शुल्काची रक्कम -८१.८१ लाख

०००००

कोट

शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झालेली आहे. जिल्ह्यात १९ हजार ७१५ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- रमेश तांगडे

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

...................

कोट

कोरोनामुळे दहावीच्या शाळा जवळपास १ महिनाभर सुरू होत्या. त्यानंतर शाळाही बंद होत्या. ऑनलाईन पद्धतीने शिकवणी झाली. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने शुल्क परत मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे.

- संतोषी चव्हाण, विद्यार्थिनी

०००००

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे परीक्षा शुल्क परत मिळणे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे. आतापर्यंत परीक्षा शुल्क परत मिळायला हवे होते.

- दीपक शर्मा

विद्यार्थी