शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारग्रस्तांचे १0५ प्रस्ताव रखडले

By admin | Updated: December 14, 2015 02:30 IST

गंभीर आजारातही वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाकडून रुग्णांची थट्टा.

संतोष वानखडे / वाशिम : दुर्धर आजारात शासनाकडून १५ हजारांची मदत मिळण्यासाठी १0५ रुग्ण लाभा र्थ्यांनी सादर केलेले प्रस्ताव आरोग्य विभागाच्या लालफीतशाहीत अडकले आहेत. गंभीर आजारातही प्रशासन थट्टा करीत असल्याने रुग्णांची डोकेदुखी वाढली आहे. नानाविध कारणांमुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. गोरगरीब रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, किडनीचा विकार यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने शासनाने सरकारी दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. याबरोबरच गोरगरीब रुग्णांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्यदेखील दिले जाते. राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या कर्करोग, हृदयरोग व किडनीग्रस्त रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणत: एका महिन्याच्या आ त या प्रस्तावाची पडताळणी आणि मंजुरात या प्रशासकीय बाबी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मार्च ते सप्टेंबर २0१५ या सात महिन्यांत आरोग्य विभागाकडे एकूण १६८ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राधिकृत दवाखाना नसणे, या पूर्वी लाभ घेणे, दुर्धर आजारात न मोडणे, प्रस्ताव आणि उपचार पत्रकावरील नावात तफावत असणे आदी कारणांमुळे ६३ प्रस्ताव छाननीत बाद झाले. परिणामी, १0५ प्रस्तावांना मंजुरात देऊन दुर्धर आजाराशी संघर्ष करणार्‍या रुग्णांना १५ हजारांची मदत तातडीने मिळणे अपेक्षित होते; मात्र डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंंतही हे प्रस्ताव लालफीतशाहीत ठेवून प्रशासनाने दुर्धर आजारग्रस्तांची जणू थट्टाच मांडली. पात्रता यादीत वाशिम तालुक्यातील ३१, मंगरुळपीर १८, मानोरा १७, मालेगाव १६, रिसोड १५ आणि कारंजा तालुक्यातील आठ प्रस्तांवाचा समावेश आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एकूण ५७ रुग्णांनी प्रस्ताव सादर केले. याप्रमाणेच ३0 हृदयरुग्ण आणि किडनीचा विकार जडलेल्या १८ रुग्णांनी आरोग्य विभागाची मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव सादर केले. कर्करोग, हृदयरोग व किडनी विकार यांसारख्या गंभीर आजारांशी धैर्याने दोन हात करणार्‍या या रुग्णांना जिल्हा परिषदेकडून मानसिक व आर्थिक आधार मिळण्याऐवजी, त्यांच्यावर प्रस्तावांच्या मंजुरासाठी जिल्हा परिषदेच्या पायर्‍या झिजविण्याची वेळ आली.