शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी जिल्ह्यात होणार १०० ‘ऑर्गनिक युनिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST

जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारण १२ ते १८ टक्के सेंद्रीय कर्ब असलेली शेतजमीन सुपिक मानली जाते. ...

जमिनीच्या सुपिकतेसाठी सेंद्रीय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. साधारण १२ ते १८ टक्के सेंद्रीय कर्ब असलेली शेतजमीन सुपिक मानली जाते. सेंद्रीय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत राहण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते. तथापि, जिल्ह्यात गत काही वर्षांत शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांसह रासायनिक कीटकनाशकाचा वारेमाप वापर होत आहे. त्यामुळे जमिनीतील मूळ सेंद्रीय कर्बांचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून, शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. ही प्रक्रिया पुढे, अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यातील शेती नापिक होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतजमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात १०० ऑर्गनिक युनिट स्थापन करण्याची योजना आखली आहे. जिल्ह्यातील १०० शेतकरी गटांना हे ऑर्गनिक युनिट दिले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

कृषी विभाग देणार प्रशिक्षण

जिल्ह्यात सेंद्रीय कर्ब निर्मिती करण्यासाठी प्रस्तावित ऑर्गनिक युनिटची संकल्पना यशस्वी व्हावी आणि शेतकऱ्यांचा त्याचा फायदा व्हावा म्हणून कृषी विभाग शेतकरी गटांना ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएचडी आदिंसह सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी आवश्यक कल्चर तयार करण्याबाबत प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणानंतर ऑर्गनिक युनिटमध्ये निर्मित केले जाणारे सेंद्रीय कर्बाचे कल्चर शेतकऱ्यांना अल्प किमतीत वितरित करून त्याआधार सेंद्रीय कर्ब निर्मिती करण्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

---------------

१० ग्रॅम कल्चरपासून होणार १० किलो सेंद्रीय कर्ब

शेतजमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या ऑर्गनिक युनिटमधून शेतकऱ्यांना १० ग्रॅम कल्चर अवघ्या १० रुपयांत घेता येणार आहे. या दहा ग्रॅमपासून शेतकरी एका एकरासाठी लागणारे १० किलो सेंद्रीय कर्ब तयार करून त्याचा शेतीजमिनीसाठी वापर करू शकणार आहेत. बाजारात १५० रुपये प्रती किलो दराने मिळणारे सेंद्रीय कर्ब अवघ्या १० रुपयांत तयार करण्याबाबत शेतकरी गटांकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

------------------

रायझोबियम

कोट: रासायनिक खताच्या वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीची सुपिकता घटली आहे. त्यामुळे सेंद्रीय कर्ब वाढविण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यासाठी ऑर्गनिक युनिट अर्थात सेंद्रीय कर्ब निर्मितीसाठी लघु प्रयोगशाळा उभारण्याची तयारी आहे. जिल्ह्यातील शंभर शेतकरी गटांना या प्रयोगशाळा दिल्या जातील. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नीती आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम