शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्यामध्ये गैरव्यवहार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:22 IST

निकृष्ट दर्जाचे कापड : ई-निविदेद्वारे खरेदीची मागणी

हितेन नाईक

पालघर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या गणवेश पुरवठ्यामध्ये मोठा गैरव्यवहार होऊन विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे कापड वापरून गणवेश दिले जात आहेत. यामुळे जिल्हास्तरावर ई-निविदेद्वारे खरेदी करून विद्यार्थ्यांना योग्य गणवेश पुरवठा व्हावा, अशी मागणी केली जात आहे.

जिल्हा परिषदअंतर्गत लाखो विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाअंतर्गत प्रत्येक वर्षी प्रति विद्यार्थी दोन गणवेशांचा पुरवठा करण्यात येतो. प्रति गणवेश तीनशे रुपयांचे अनुदान प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जात असून दोन गणवेशासाठी एकूण सहाशे रुपये प्रति विद्यार्थी अनुदान शासनाकडून प्राप्त होते. गणवेश पुरवठा करण्याकामी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून निधी वितरीत करण्यात येतो व तेथून हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केला जातो. गणवेश खरेदीचे सर्व अधिकार हे त्या त्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना प्रदान करण्यात आले असून या दोघांच्या संमतीने गणवेश खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र या गणवेश वितरणाच्या प्रक्रियेत स्थानिक व्यापारांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे कापड खरेदी केले जात असल्याचा संशय जव्हार नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते दीपक कांगणे यांनी व्यक्त केला आहे. कापडाचा दर्जा निकृष्ट असल्याने पहिल्या धुण्यातच त्यांच्या गणवेशावर गोळे निर्माण होत कापड निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. हे गणवेश दोन ते तीन महिन्यातच फाटण्याच्या अवस्थेत पोचत असून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेष मिळावेत, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कांगणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, ई-निविदेद्वारे कापड खरेदीची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांच्याकडे केली असल्याचे कांगणे यांनी सांगितले.गणवेशाच्या कपडा खरेदीसाठी जो व्यापारी जास्त टक्केवर देईल, त्याच्याकडून गणवेशाचे कापड खरेदी केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या गैरव्यवहारात हे व्यापारी प्रति गणवेश ५० रुपये ते ८० रुपये कमिशन काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचे आमिष दाखवितात. यामुळे एका विद्यार्थ्यामागे १०० ते १६० रुपये कमिशन दिले जात असल्याचे कांगणे यांनी उपाध्यक्षांकडे केलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.योजनेचा लाभ ५९ हजार विद्यार्थ्यांनाजि.प.च्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०१९-२० मध्ये पालघर, डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड व वाडा या आठ तालुक्यांत एकूणएक लाख ५९ हजार ६३९ विद्यार्थ्यांना गणवेश योजनेचा लाभ देण्यात आला होता.मागील वर्षी ९,२८,0३,२०० रु. इतका खर्च गणवेशावर केला. या खरेदीत प्रति विद्यार्थी भ्रष्टाचार पकडला तर १ कोटी ६० लाख ते २ कोटी ५६ लाखांची बचत होऊ शकली असती, असा दावा कांगणे यांनी केला आहे.गणवेश खरेदी प्रक्रिया एकाच छत्रछायेखाली व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. एक निश्चित धोरण ठरवले गेले असते तर विद्यार्थ्यांना साहित्य देता आले असते.- नीलेश गंधे, माजी उपाध्यक्ष, जि.प. पालघर

टॅग्स :palgharपालघरzp schoolजिल्हा परिषद शाळा