शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या इंग्रजी शाळांबाबत संभ्रम कायम

By admin | Updated: June 16, 2017 01:51 IST

जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मोफत इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी प्रायोगिक तत्वावर २०१० मध्ये नर्सरीचे व ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे इंग्रजी वर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड: जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये मोफत इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी प्रायोगिक तत्वावर २०१० मध्ये नर्सरीचे व ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले. गेली ६ वर्षापासून या शाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली या संधीचा फायदा गरीब व गरजू विद्यार्थी घेत होते परंतु सन २०१५-१६ च्या लेखा परिक्षाणात या योजनेबाबत आक्षेप घेण्यात आल्याने हे वर्ग बंद करण्यात आवे अस आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील शाळांना दिला आहे. त्यामुळे गरीबाच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये असाचा उद्देश या शिक्षण विभागाचा आहे का असा सवाल पालकांनी केला आहे. हे वर्ग अचानक बंद झाल्याने या मुलांना मराठीतून शिक्षण घ्यावे लागेल किंवा महागडया शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहे त्यामुळे या शैक्षणिक वर्षात यावर उपाय करून हे वर्ग सुरूच ठेवावे अशी मागणी पालकांनी केली.शासनस्तरावरची मान्यता नसल्याने लेखा परिक्षाणात आक्षेप घेतल्यामुळे हे वर्ग बंद करण्याचा निर्णय झाला असून तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. -भगवान मोकाशी, गटशिक्षणाधिकारी, विक्रमगड