शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कुडूस नाक्यावर युवासेनेचा चक्का जाम

By admin | Updated: October 27, 2015 00:03 IST

भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही या रस्त्यासाठी टोल आकारला जात आहे.

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले असतानाही या रस्त्यासाठी टोल आकारला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाके बंद करावेत, या मागणीसाठी युवासेनेने सोमवारी कुडूस नाका येथे चक्का जाम छेडीत प्रशासनाला जाब विचारला. या वेळी एक तास महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी केले. भिवंडी-वाडा-मनोर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका शासनाने बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला दिला आहे. त्यासाठी २२ महिन्यांचा कालावधी कंपनीला दिला होता. मात्र, चार वर्षे उलटूनही रस्त्याचे काम अपूर्ण तर आहेच, पण झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. या खराब कामामुळे येथे नित्याचीच वाहतूककोंडी होत असते. तसेच खड्ड्यांमुळे वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक अपघात झाले असून आतापर्यंत ३०० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप या वेळी शिवसेनेने केला.या आंदोलनाची दखल वाड्याचे तहसीलदार संदीप चव्हाण यांनी घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण व निकृष्ट कामाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून त्या बाबतीत कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तर, ३१ तारखेपर्यंत टोल बंद न केल्यास १ तारखेला शिवसैनिक हातात कायदा घेऊन टोल नाके बंद करतील, असा गंभीर इशारा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे नेते निलेश गंधे, सुनील पाटील, चंद्रकांत पष्टे, कांतिलाल देशमुख, सचिन पाटील, प्रकाश केणे, निलेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष छाया भोईर, जि.प. सदस्या भारती कामडी, माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या म्हसकर, अजिंक्य पाटील आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. या वेळी सुप्रीम कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. (वार्ताहर)