शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही ११ वी प्रवेशाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:04 IST

तालुक्याचा दहावीचा ८९.०४ टक्के निकाल लागला असून, १ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र तालुक्यात ११ वी प्रवेशाच्या जागा अवघ्या ५५० आहेत

हुसेन मेमन जव्हार : तालुक्याचा दहावीचा ८९.०४ टक्के निकाल लागला असून, १ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. मात्र तालुक्यात ११ वी प्रवेशाच्या जागा अवघ्या ५५० आहेत. त्यामुळे यावर्षीही अकरावी प्रवेशाच्या जागा कमी असल्याने कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला अथवा इतर ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. परणामी ११ वी प्रवेशाची समस्या यावर्षीही उद्भवणार आहे. त्यामुळे तेराशे विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येणार कि काय? अशी भीती पालक व विद्यार्थ्यांना भेडसावते आहे.जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणा-या आश्रम शाळा आणि अनुदानित आश्रम शाळा यातून २ हजार एकशे आठ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील १ हजार ८७७ विद्यार्थी परीक्षा पास झाले आहेत. तसेच यामध्ये भारती विद्यापीठ हायस्कूल, वडोली हायस्कूल, श्रीजयेश्वर विद्यालय डेंगाचीमेट, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जव्हार, अशा चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याच बरोबर १० आश्रम शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. त्यामुळे ११ वीत प्रवेश मिळेल कि नाही अशी चिंता पालकांना वाटायला लागली आहे.दरम्यान जव्हार शहरात अवघे दोन कॉलेज आहेत तर ११ वी साठी शासकीय आश्रम शाळा विनवळ, देहेरा, दाभोसा, न्याहाळा, अशा ठिकाणी बारावी पर्यंत वर्ग आहेत. तसेच यापैकी काही विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची समस्या यावर्षीही गंभीर आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला असून, पालकवर्ग चिंताक्रांत झाला आहे.