शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:45 IST

सातपाटी किनारपट्टी परिसरात चिंता : महत्प्रयासाने पकडून आणलेले मासे अवकाळीमुळे कुजले, विवंचनेत पडली भर

हितेन नाईक

पालघर : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन पातळीवरून शेतकऱ्यांना दिली जात असताना मच्छीमारांच्या कुजलेल्या माश्यांची नुकसान भरपाईचा दर मात्र अजून ठरलेला नाही. कर्जाचे डोंगर डोक्यावर घेत पुन्हा मासेमारीला जाऊन किनाºयावर आणलेले मासे वाळत घालण्याच्या वेळेसच पुन्हा सातपाटीसह किनारपट्टीवर पावसाच्या सरी कोसळल्याने महत्प्रयासाने पकडून आणलेल्या माश्यांचे आता करायचे तरी काय? अशा विवंचनेत मच्छीमार महिला आहेत.

आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १ लाख ५ हजार १६५.७४ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याने शासनाने त्यांना नुकसान भरपाईचे वाटप केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांचे दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. याच दरम्यान मच्छीमारांचे चक्रीवादळामुळे मासेमारीचे वाया गेलेले दिवस आणि अवकाळीमुळे कुजून गेलेल्या माशांच्या नुकसानीच्या भरपाईबाबत मात्र ना राज्य सरकार काही कार्यवाही करीत ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करत. त्यामुळे मच्छीमार समाज व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. मच्छिमार संघटनांनी, मच्छिमार नेत्यांनी आपल्या शिष्टमंडळासह नेहमीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची निवेदने मंत्र्यांना दिली आहेत. मात्र २ महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. मच्छीमार सहकारी संस्थांकडून नुकसानीची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाकडून मागविण्यात आल्याचे कळते. त्यानंतरही नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारकडून कुठलीही घोषणा केली जात नाही. शासनाने २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान देण्यात येणाºया नुकसान भरपाईच्या आदेशात अवकाळी अथवा नैसर्गिक आपत्ती-दरम्यान झालेल्या माश्यांची नुकसान भरपाई देण्याबाबत कुठलेही आदेशच नमूद केलेले नसल्याने मच्छीमारांना भरपाई देण्यात जिल्हाधिकाºयांसह सर्व यंत्रणा हतबल ठरली आहे.ढगाळ वातावरणामुळे मासे सुकवण्यात अडचणीच्समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सातपाटीसह अनेक गावातील बोटी किनाºयाला लागल्या आहेत. आपल्या बोटीतून किनाºयावर उतरलेल्या बोंबील, मांदेली, करंदी हे मासे निवडून ते मासे बांबूच्या वलांदीवर सुकविण्याच्या बेतात असताना अचानक पावसाने सुरुवात केल्याने आता या माश्यांचे करायचे काय? असा गंभीर प्रश्न त्यांच्या चेहºयावर दिसून येत होता.अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने बोंबील व इतर मासे सुकत नसून मार्गशिर्ष महिना सुरू असल्याने ओले मासेही संपत नसल्याने महिला वर्ग चिंतेत आहे. दुहेरी संकटात सापडलेल्या या महिलांपुढे कुटुंबाचे आर्थिक चक्र चालवायचे कसे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून किनाºयावर पडलेल्या माश्यांकडे डोळ्यात पाणी आणून पाहण्याशिवाय आमच्यापुढे अन्य कुठला पर्याय शिल्लक नाही, असे हताश उद्गार योगिता मेहेर या महिलेने काढले.मत्स्य उत्पादनाचा आकडा डळमळतोय : दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनाचा आकडा डळमळू लागला असून सहकारी संस्था कर्जाच्या विळख्यात सापडू लागल्या आहेत. डिझेल अनुदानाचा थकलेला कोट्यवधी रुपयांचा आकडा, समुद्रातील वाढते प्रदूषण, वाढलेली महागाई आदी कारणांनी मच्छीमारी बोटी हळूहळू बंद पडू लागल्या आहेत, अशी चिंता सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर