शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी बविआसोबत करणार हातमिळवणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:27 IST

सत्ता टिकवण्याचे भाजपसमोर आव्हान : युतीतील वादाचे पडसाद उमटणार

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : देशात असलेली मोदी लाट आणि युतीच्या ताकदीवर पालघर जिल्हा परिषदेवर सत्ता प्रस्थापित करणाऱ्या भाजपची आता ही सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी मोठीच कसोटी लागणार आहे. ओसरलेल्या मोदी लाटेबरोबरच युतीमधील त्यांचा भागीदार असलेल्या शिवसेना पक्षानेही त्यांची साथ सोडल्याने सत्ता स्थापनेची त्यांची वाट बिकट बनली आहे. अशा वेळी पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने बविआशी हातमिळवणी केल्याची माहिती पुढे येत आहे.पालघर जिल्हा परिषदेत भाजप २१, शिवसेना १५, बविआ १०, राष्ट्रवादी ४, माकप ५, काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे एकूण ५७ जागांचे बलाबल असून सेनेसह बहुजन विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपने आपली पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. जिल्हा निर्मितीनंतर जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ आणि इतर पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप पक्ष कोणाशी तडजोड करून सत्ता स्थापन करेल ह्या बाबत संदिग्धता होती.राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर करीत सेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर बविआनेही सत्ता स्थापनेसाठी भाजपला मदतीची आवश्यकता असल्याने बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर करीत आपला राजकीय शत्रू असलेल्या शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी आपण बविआशी कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याचे सेनेने जाहीर केले होते. आणि भाजपने बविआशी हातमिळवणी केल्यास सेना अशा युतीमध्ये सहभागी होणार नसल्याचे सेनेने स्पष्ट केले होते. सेनेच्या ह्या भूमिकेमुळे भाजपची मात्र कोंडी झाली होती. युतीतील आपल्या सहकारी पक्षाला नाकारून बविआशी आघाडी करून सत्ता स्थापन केल्यास मतदारांमध्ये वेगळा संदेश जाईल, अशी भीती भाजपला वाटत असल्याने शेवटी भाजपने सेनेशी युती करीत सत्ता स्थापन केली. अध्यक्षा म्हणून भाजपच्या सुरेखा थेतले तर उपाध्यक्षपदी सेनेच्या सचिन पाटील यांची निवड करण्यात आली होती. सध्या राज्यातील राजकीय चित्र बदलले असून भाजप-शिवसेनेची अभेद्य युती दुभंगली असून सेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी तयार करून सत्ता स्थापन केली आहे.‘रात्रीस खेळ’ : छुप्या डावाला सुरुवातच्भाजपनेही जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी आपल्या छुप्या डावाला सुरुवात केली असून सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि बहुजन विकास आघाडी एकत्र लढण्याच्या हालचालींसंदर्भात ‘रात्रीस खेळ’ सुरू झाले आहेत.च्युतीतील आपल्या नैसर्गिक मित्राला बाजूला करत शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळविल्याने राज्यात युतीतील दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली असून त्याचे पडसाद आतापासूनत पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू लागले आहेत.