शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 22:15 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती २ दिवसांपूर्वी झाली

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती २ दिवसांपूर्वी झाली. परंतु, सभापतीपदाची निवड मात्र करण्यात आली नाही. त्यामुळे कोणाला हे पद मिळेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीवरील सदस्यांची निवड करण्यात आली. या महासभेत विरोधी पक्षनेता, विविध विषय समितीचे सभापती यांच्या नियुक्त्या करण्यात येतील, असा सर्वसाधारण अंदाज होता. मात्र, या महासभेमध्ये केवळ २ समित्यांवरील सदस्यांची निवड झाली. त्यामुळे आता या २ समित्यांचे सभापती कोण, अशी चर्चा रंगात आली आहे. स्थायी समितीसाठी प्रकाश रॉड्रिग्ज व नितीन राऊत या दोघांची नावे चर्चेत आहेत. प्रकाश रॉड्रिग्ज हे तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष होते, तर नितीन राऊत यांनीही नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. गेली ५ वर्षे ते महानगरपालिकेच्या ‘ई’ प्रभाग समितीचे सभापती होते. या दोघांपैकी एकाची निवड स्थायी समिती सभापतीपदी होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी विरारच्या नगरसेविका कांता पाटील व काँग्रेसमधून बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून निवडून आलेल्या छाया पाटील या दोघींपैकी एकीला संधी मिळण्याची शक्यता आहे. कांता पाटील या तत्कालीन विरार नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष होत्या, तर छाया पाटील या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक असून दोनदा नगरसेविका म्हणून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आल्या होत्या. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व पुन्हा निवडून आल्या. यंदा निवडणुकीपूर्वी त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करून निवडणूक लढवली व त्या चांगल्या मताधिक्क्याने पुन्हा निवडून आल्या. अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांना ओळखले जाते. (प्रतिनिधी)