शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालय गेले कुठे?

By admin | Updated: October 10, 2015 23:30 IST

कित्येक महिन्यांपासून जव्हार येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत कार्यालयातील प्रांत अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तसेच कार्यालयाला नावाचा फलकसुद्धा नाही.

जव्हार : कित्येक महिन्यांपासून जव्हार येथील उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत कार्यालयातील प्रांत अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तसेच कार्यालयाला नावाचा फलकसुद्धा नाही. त्यामुळे येथील आदिवासी जनतेची मोठी तारांबळ उडते आहे. प्रांत कार्यालय गेले कुठे, असा प्रश्न सर्वसाधारण आदिवासी बांधवांना पडतो आहे. जातीचे दाखले तसेच इतर दाखल्यांकरिता नेहमीप्रमाणे खेटे मारावे लागणाऱ्या कार्यालयाच्या कामकाजाला जनता कंटाळली होती. त्यात भरीसभर म्हणजे कार्यालयात प्रांत अधिकाऱ्यांचे पदच रिक्त असल्यामुळे आदिवासी जनतेचे हाल होत आहेत.सध्या जव्हारच्या प्रांत अधिकाऱ्यांचा पदभार वाडा येथील प्रांत अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र, ते कधीही जव्हारला येत नाहीत. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर जून महिन्यात दाखल्यांसाठी गर्दी होत होती. त्या वेळी वाडा प्रांतही रजेवर गेल्यामुळे जव्हारचा पदभार डहाणू उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, याची माहिती जनतेला नसल्याने ते दाखल्यांवरील सहीसाठी वाडा आणि मग तिथून डहाणू असे खेटे मारत होते. त्या वेळी प्रसिद्ध माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता, त्या वेळी लवकरच जव्हारचे प्रांत अधिकारी रिक्त पद भरले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजतागायत हे रिक्त पद भरण्यात आलेले नाही. भरीसभर म्हणजे कार्यालयाचा फलकच कित्येक महिन्यांपासून गायब आहे. त्यामुळे कार्यालय बंदच आहे का, असा प्रश्न पडला आहे. (वार्ताहर)- सध्या रेतीच्या गाड्यांची पकडापकडी जास्त प्रमाणात सुरू झाली आहे. म्हणजेच इतक्या वर्षात कारवाई शून्य आणि आता अचानक गाड्यांची पकडापकडी तहसील व प्रांत कार्यालयाकडून केली जात आहे. एका ब्रासची रॉयल्टी असताना २ ब्रास माल आणणे व एका ब्रासला दंड ठोठावणे अशा कारवाया सध्या प्रांत कार्यालयाकडून होत आहेत. मग, याच कारवाया या आधी का झाल्या नाही? अचानक कारवाई करण्याचे कारण काय? पूर्वी रॉयल्टी नव्हती तरी गौणखनिजाच्या गाड्या सर्रासपणे वावरत होत्या. त्या वेळी कार्यालय झोपी गेले होते का? असे अनेक प्रश्न येथील जनता करीत आहे.