शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राखीव वन अनुसंधान केंद्रातील खैर चोरीला; किमती झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:59 IST

जमीन बीज भूखंडसाठी सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्रासाठी वाडा यांना दिली आहे. मात्र जबाबदारी आमची आहे. तेथे अडीच महिने अगोदर खैराची कत्तल झाली होती.

मनोर : मनोर-पालघर रस्त्यावर चहाडे गावाच्या हद्दीतील राखीव वन अनुसंधान केंद्रातील भले मोठे खैर जातीचे किमती झाड कत्तल करून चोरीस गेल्याची घटना घडली आहे.

मनोर-पालघर मुख्य रस्त्याच्या बाजूला चहाडे गावाच्या हद्दीत घनदाट जंगलात खैर जातीचे उत्तम दर्जाची झाडे आहेत. त्यासाठी शासनाने २०११-१२ ला ५ हेक्टरमध्ये सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्राची स्थापना केली होती. तेव्हापासून नागपूर व अनेक जिल्ह्यातील त्या खैर झाडांचे संशोधन (रिचर्स) करण्यासाठी वन विभागाचे क्लास वन अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी येतात. बीज भूखंड राखीव वन म्हणून पालघर वनक्षेत्र अधिकारी अंतर्गत येत असून त्या ठिकाणावरून कोणी तरी अज्ञात इसमांनी खैर झाडांची कत्तल करून लाकडे लंपास केली आहेत. रात्रंदिवस रहदारीचा रस्ता असून सुद्धा खैर झाडांची कत्तल होते. तसेच गेल्या महिन्यात कोकनेर गावाच्या हद्दीतही खैर झाडांची कत्तल झाली होती. त्यातील काही लाकडे नेटाली डेपोत जमा केली होती, तर काही लाकडे लंपास केली होती. वन विभाग डहाणू अंतर्गत येणारे वन क्षेत्रीय अधिकारी पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील चहाडे गावाच्या हद्दीतील जमीन महाराष्ट्र शासनाचा सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्रास खैर बीज भूखंड म्हणून दिलेली आहे. त्याची देखरेख करण्याची जबाबदारी वनपाल क्षेत्र चहाडे यांची असून झाडांची कत्तल झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर वनमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.आरोपी पकडले तपास चालू असल्याचा दावायासंदर्भात पालघरचे वनक्षेत्रीय अधिकारी पंकज पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तेथील वनपाल यांच्याशी संपर्क करा. ते सविस्तर माहिती देतील. तेच गुन्ह्याचा तपास करीत आहेत. चहाडे येथील वनपाल एम. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जमीन बीज भूखंडसाठी सहा अनुवंश शास्त्रज्ञ वन अनुसंधान केंद्रासाठी वाडा यांना दिली आहे. मात्र जबाबदारी आमची आहे. तेथे अडीच महिने अगोदर खैराची कत्तल झाली होती. तो माल सर्व नेटाली डेपोमध्ये आणला आहे. आरोपी पकडले आहेत. तपास चालू आहे.