शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार तालुक्यातील पेरण्या वाया

By admin | Updated: June 20, 2017 06:42 IST

पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दडी मारल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच यंत्रांच्या नांगरीणीच्या युगात नंदनमाळ

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यत दडी मारल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच यंत्रांच्या नांगरीणीच्या युगात नंदनमाळ येथील शेतकरी मात्र गरीबीमुळे लाकडी नांगराचा वापर करीत आहेत.जून च्या पाहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे भात, नागली, तुरी, वरी, उडीद, भुईमूग, हळद, याची लागवड केली, त्यानंतर त्याला लागणारे महागडे खतही विकत घेऊन शेतात टाकले आहे. परंतु पावसाने अचानक दडी मारल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पाऊस पडेल याचीही काही शाश्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा जिल्हा बँक अडचणीत असल्याने व अन्य कुठून आर्थिक सहाय्य मिळालेले नसतांनाही शेतकऱ्यांनी अनेक लटपटी खटपटी करून नांगरणी, पेरणी केली, त्यासाठी महागडे मजूरही वापरले, मात्र गेल्या १८ ते २० दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे ते सारे फुकट गेल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेकडो शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पं.स. कृषी विभागात नुकसान भरपाई करीता अर्ज करून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे. नंदनमाळ येथील १५ ते २० शेतकरी एकत्र येऊन दुसऱ्या पाड्यातील सुताराकडून नविन लाकडी नांगरणी अवजारे तयार करून शेतीची तयारी करीत असतात मोठी मेहनत घेऊन १२ ते १५ कि.मी. अंतरावर ही अवजड अवजारे डोक्यावर वाहून नेतात येथील गरीब आदिवासी जनतेला शेती शिवाय दुसार पर्याय नसल्यामुळे हंगामाच्या काळात भूमीहिन मजुरांना मोठी मागणी असते, मात्र शेतीचा हंगाम संपल्यानंतर त्यांच्या हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यापुढे स्थलांतर शिवाय पर्याय नसतो. ते विटभट्टी, बांधकाम व अन्य क्षेत्रात रोजगार शोधत असतात.