शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता-दुभाजकांवर साकारली वारली चित्रकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:16 IST

वसईच्या स्टेला येथील अनोखा प्रकार; महापालिका क्षेत्रातील अन्य रस्त्यांवरही चित्रे काढण्याची मागणी

- आशीष राणेवसई : ‘स्वच्छ वसई हरित वसई’ या संदेशाने गाजत असलेल्या वसईमधील नवघर-माणिकपूर शहरातील स्टेला-भाबोळा येथील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर ‘वारली संस्कृती’ची कलाकुसर साकारल्यामुळे हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.वसई-विरार शहर महानगरपालिकेने या ठिकाणी अत्यंत आकर्षक, सुबक व लक्षवेधी ठरणारे ‘वारली संस्कृती’चे हे चित्र रेखाटल्यामुळे हा प्रयत्न शहरातील स्वच्छता राखण्यासाठी केलेला एक कल्पक प्रयोग ठरला असल्याचे मत येथील स्थानिक नागरिक व वसईतील उद्योजक आशीष धुरी यांनी ‘लोकमत’ला दिली. निदान गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्याने रंगणाºया अशा दुभाजकांची या कलेच्या माध्यमातून तरी तूर्तास सुटका झाली आहे, असे ते म्हणाले.दुभाजकांवरील कलेचा आधार घेत वसई-विरारमधील सर्वच मुख्य रस्त्यांच्या दुभाजकाची व्याप्ती तथा लांबी व रुंदी वाढवून त्यावर अशी कलाकुसर रेखाटण्याची मागणीही आता यानिमित्ताने नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, रस्ते दुभाजकांची दयनीय अवस्था, धोकादायक स्थितीतील दुभाजक अशा नानाविध मुद्यांवर वाहनचालक व प्रवाशांकडून नेहमीच महापालिका प्रशासनावर बोचरी टीका केली जात असते. त्यामुळे दुभाजकांना वेगळ्या पद्धतीने सजवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि त्याचा श्रीगणेशा वसई-विरार महापालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समितीकडून करण्यात आला. येथील स्टेला-भाबोळा रस्ता दुभाजकाची उंची वाढवून त्यावर चक्क वारली संस्कृतीच्या चित्रकलेची कलाकुसर करण्यात आली.या सुंदर, सुबक आणि आकर्षक कलाकुसरीमुळे येथील रस्ता दुभाजक लक्षवेधी ठरला असून रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी काही काळ थांबून या दुभाजकावरील वारली कलाकुसर मोठा जिज्ञासेने न्याहाळत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समितीच्या हद्दीत येणाºया भाबोळा येथील साईबाबा मंदिरालगत असलेला हा दुभाजक दोन्ही बाजूंनी लाल व पांढºया रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर पांढºया रंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेली वारली चित्रकला साकारण्यात आली आहे.विद्रूपीकरण थांबेल?गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगणारा हा ६० ते ७० फुटांचा दुभाजक वारली चित्रकलेमुळे लक्षवेधी ठरला असून ही रंगरंगोटी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. या आकर्षक चित्रांमुळे किमान आता तरी हे दुभाजक कोणी अस्वच्छ करणार नाही, असे नवघर-माणिकपूर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त गिल्सन घोन्सालवीस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.