शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात मतदारराजाने बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:30 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पालघर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मतदानाच्या वेळी पदवीधर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला

पालघर : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी पालघर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मतदानाच्या वेळी पदवीधर मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत असतानाही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजावल्याने सुमारे ६४ टक्के मतदान झाले आहे.दिवसभर मुसळधार सुरू असलेल्या पावसाचा या निवडणुकीच्या मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी ८ हजार ९१२ पुरुष तर ८ हजार ८७ स्त्रिया असे एकूण १६ हजार ९८२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते. पालघर येथे ७८.७ टक्के, बोईसर केंद्रावर ७३.६ टक्के तर सफाळे केंद्रावर ८०.५ टक्के मतदान झाले. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते व कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढत होते. पदवीधर निवडणूकीत पहिल्यांदाच इतका उत्साह मतदारांमध्ये दिसून येत होता.दुपारनंतर मतदानात वाढसकाळी मतदानाला थंड प्रतिसाद मिळत असला तरी मात्र दुपार नंतर मतदानात वाढ झाली. संध्याकाळी पालघर सह अनेक मतदान केंद्रावर शेकडोने मतदार मतदानासाठी आल्याने त्यांना उशिरा पर्यंत मतदान करून देण्यात आले.कासा केंद्रात ८९.१७ टक्के मतदानकासा : डहाणू तालुक्यातील कासा केंद्रात कोंकण पदवीधर मतदार संघासाठी सोमवारी झालेल्या मतदानात ८९.१७ टक्के इतके मतदान झाले. कासा केंद्रात ५३ स्त्री व १७८ पुरु ष असे एकूण २३१ मतदार होते. त्यापैकी ४३ स्त्री व १६३ पुरु ष असे एकूण २०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सकाळपासून पाऊस होता तरी मतदानासाठी दूरवरून मतदार येत होते.