शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

वसईत पोलिसांच्या जाचाला कंटाळून दांपत्याचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:47 IST

वसईत पोलिसांच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याचा विषय चर्चेत असतानाच आता या प्रकरणात आरोपी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई नाही झाली

विरार : वसईत पोलिसांच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याचा विषय चर्चेत असतानाच आता या प्रकरणात आरोपी असणाऱ्या पोलिसांवर कारवाई नाही झाली तर, आई वडिलांनी देखील सामुहिक आत्मदहनाचा इशारा पोलिस अधीक्षकांना दिला आहे.आपल्या दोन्ही मुलांच्या आत्महत्ये प्रकरणी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक आणि डीवायएसपी देखील तितकेच जबाबदार असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील वडील विनय झा यांनी केला आहे. ज्या पोलिसांना आरोपीचा पिंजºयात उभे केले त्यांची चौकशी पोलिसच करत असल्याने आपल्याला न्याय कसा मिळणार? अशी व्यथा वजा अविश्वास त्यांनी बोलून दाखविला असून, आपल्याला जर लवकर न्याय मिळाला नाही तर कुटुंबासहित सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा विनय झा यांनी दिला आहे. या सर्व प्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यासह आणखी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात पालघर चे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी झा बंधूंच्या वडिलांनी केली आहे.पोलिसांनी दोन्हीं भावांना खोट्या गुह्यात अडकवून त्यांचा छळ मांडला होता. विकास झा याने ९ नोव्हेंबर २०१७ रोजी डीवायएसपी यांच्या कार्यालयात जाऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.मृत विकास झा ला न्याय मिळण्यासाठी त्याचा भाऊ अमित झा हा कायदेशीर प्रयत्न करत होता. परंतु त्याला देखील न्याय मिळण्यापासून रोखले जात होते. अमितच्या वाटेला देखील नैराश्या येत होते. २० जानेवारी २०१८ रोजी अमित ने कीटकनाशक द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती. दोन्हीं भावांनी आत्महत्या केल्याने हे प्रकरण तालुक्यात गाजले होते.