शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

वसईत कांदा १०० रुपये किलो

By admin | Updated: August 22, 2015 22:25 IST

आज वसई-विरारच्या बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला. दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या कांद्याची आज १०० रु पये किलो दराने विक्री होत होती.

वसई : आज वसई-विरारच्या बाजारात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला. दोन दिवसांपूर्वी ६० रुपये किलो या दराने मिळणाऱ्या कांद्याची आज १०० रु पये किलो दराने विक्री होत होती. या दरवाढीचा परिणाम विक्रीवरही जाणवल्याचे अनेक कांदा विक्रेत्यांनी सांगितले. दुसरीकडे औषधी म्हणून ओळख असलेला वसईचा सुप्रसिद्ध पांढरा कांदाही बाजारातून गायब झाला आहे. कांद्याच्या उसळीमुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला तो परवडेनासा झाला आहे.मान्सूनपूर्व पडलेला अवकाळी पाऊस तसेच मोसमी पावसाने दिलेल्या ओढीमुळे त्याचा थेट परिणाम कांद्याच्या शेतीवर झाला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. यामुळे आवक व विक्री यामधील तफावतीमुळे कांद्याने भाव खाल्ला आहे.सणासुदीच्या काळात वसई-विरारच्या बाजारात भाजीपाल्याचेही दर आकाशाला भिडले आहेत. श्रावणात साधारण भाजीपाला स्वस्त असतो. मात्र, यंदा हे गृहीतकही मोडीत निघाले आहे. कांदा विक्रेत्यांनी आज सकाळपासून १०० रुपये किलो या दराने तो विकण्यास सुरुवात केल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले नसेल तरच नवल. वसई-विरार परिसरात वाशी, नाशिक व वसईच्या ग्रामीण भागामधून कांदा विक्रीसाठी येत असतो. वसईच्या भुईगाव व कळंब या भागात पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते.परंतु, काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे औषधी म्हणून ओळख असलेला हा पांढरा कांदा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे यंदा पांढरा कांदा बाजारात पाहावयास मिळाला नाही. कांद्याचे दर वाढल्यामुळे विक्रीवरही त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पूर्वी ग्राहक दीड ते दोन किलो एका वेळी कांदा खरेदी करत असत, ते प्रमाण आता पाव किलो व अर्धा किलोवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच विक्रेतेही हैराण झाले आहेत.