शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वाढता उकाडा अन् वाहतूककोंडीच्या जाचाने वसई-विरारकरांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:23 IST

वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

वसई : वसई शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. वाढता उकाडा पाहता प्रवासी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.महापालिका आणि वसई वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव लक्षात घेता वेळीच या कोंडीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. वसई, अंबाडी रोड, माणिकपूर नाका तसेच पापडी, आणि सर्वाधिक वाहतूक कोंडी होणारा वसई पूर्व विभाग म्हणजेच गोखिवरे रेंज आॅफिस आणि सातिवली दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. दरम्यान वसई (पूर्व) हा तालुक्यातील एक मोठा औद्योगिक पट्टा असून साधारण वीस हजारांहुन अधिक महिला - पुरूष असा कामगार वर्ग रोज येथून प्रवास करतो. मात्र, सर्वांचा प्रवासाचा वेळ हा वाहतूक कोंडीतच जातो. तसेच डावीकडे गुजरात आणि उजवीकडे मुंबईला जोडणाऱ्या महामार्गवार जाण्यासाठी गोखिवरे व सातिवली अशा दोन स्थानिक महामार्गाचा वापर करावा लागतो. येथील गोखिवरे रेंज आॅफिस आणि तिथे सातिवली अशा दुहेरी ठिकाणी वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.कोंडीचा सर्वाधिक त्रास दुचाकींनाशहरातील वाहतूक कोंडीमुळे चालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. त्यात सर्वाधिक त्रास दुचाकी धारकांना होत असून गाडीचे क्लच, गियर आणि ब्रेक यावर नियंत्रण ठेवता -ठेवता हाताची तसेच पायाला फारच त्रास होतो. गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान प्रवास करायला तब्बल एक तासाचा कालावधी लागत आहे.अंबाडी रोड आणि माणिकपूरनाक्यावर वाहतूक पोलीस गायबवसई अंबाडी रोड आणि माणिकपूर या दोन मुख्य नाक्यावर चार रस्ते एकत्रित येतात. या ठिकाणी दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. तर सायं. ६ ते ९ दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मात्र, नेमकी कोंडीच्या वेळीच वाहतूक पोलीस देखील बºयाच वेळा गायब राहतात.रुग्णवाहिकादेखील कोंडीत?गोखिवरे ते रेंज आॅफिस दरम्यान सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६ ते ९ दरम्यान वसई वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस कधी कर्तव्यावर असतात तर कधी नसतात. पोलीस नसल्यास चालक आपल्या मनाप्रमाणे वाहन चालवतात. वाहतूक पोलिसांचे नियोजन तसेच निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे चालकांकडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. आणि रुग्ण वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यास त्याचे प्राणसुद्धा जाऊ शकतात.अंबाडी जुना रेल्वे उड्डाणपूल बंदचवसई (पूर्व) ते वसई (पश्चिम) असा जोडणारा रेल्वे उड्डाण पूल तीन महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद आहे. यामुळे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या संदर्भात वसई विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर असे बाबीवर प्रकाश पडला.वसई-पूर्व अंबाडी रोड ते गोखिवरे रेंज आॅफिस दरम्यान होणारी वाहतूक कोंडी बाबत वसई विरार महापालिकेनं मधल्या काळात रस्ता रु ंदीकरण कार्यक्र म हाती घेतला असून ग्रामस्थांशी चर्चा करून वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल याबाबत ठोस पाऊले उचलली आहेत. अजून १५ ते २० दिवसानंतर ही वाहतूक कोंडी बºयापैकी मुक्त होईल, तसेच अंबाडी रोड येथील परिवहनच्या बसेस पार्कींगमधून काढून त्यांच्यावर कारवाई सुरु आहे, त्यातच निवडणुका लागल्याने वाहतूक पोलीस व इतर ठिकाणचा बंदोबस्त पाहता थोडी कमी आहे पण आम्ही काळजी घेऊ !- संपतराव पाटीलवरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार