शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार मनपा परिवहन लंगडीच

By admin | Updated: October 31, 2015 22:35 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. त्यामुळे वसई, नालासोपारा व विरार या तीन्ही रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. तसेच या बसेस महीनोनमहिने धुतल्या जात नाहीत. अतिशय गलिच्छ अवस्थेत असलेल्या बसेस द्वारे लोकांना ही सेवा देण्यात येते.महानगरपालिकेने ३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या परिवहन सेवेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु ती सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन न करण्यात आल्यामुळे आगार, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहे, बसेस वॉशिंग सिस्टीम व वाहनदुरूस्ती इ. महत्वाच्या यंत्रणा उभ्या राहू शकल्या नाहीत. परिणामी गाड्या धुणे व वाहने पार्क करणे इ. कामे रस्त्यावरच केली जातात. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रस्त्यावर गलिच्छ अवस्थेतील बसेस धावताना पहावयास मिळत आहेत. या सेवेच्या माध्यमातून महानगरपालिका व ठेकेदारांना चांगला महसूल मिळत असतानाही प्रवाशांना सोयीसुविधा देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नव्याने नियुक्त झालेले आयुक्त सतिश लोखंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून परिवहन सेवा कशी सुधारेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वसई रोड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेस नवघर परिसरात भर रस्त्यावरच बसेस उभ्या केल्या जात असल्यामुळे संध्याकाळी येथे प्रचंड वाहतुक कोंडी होत असून गोंधळाचे वातावरण निर्माण होत असते. मध्यंतरी महानगरपालिकेने एस.टी महामंडळाला आपल्या बसेस वळवण्यासाठी त्यांच्या आगाराचा वापर करण्यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु महामंडळाने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे परिवहन सेवेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुख्यालय वगळता महानगरपालिका हद्दीत कुठेही ही परिवहन यंत्रणा सक्षम यंत्रणा उभी करू शकली नाही. (प्रतिनिधी)वाहतूक पोलीसांनी याप्रकरणी महानगरपालिकेला २० हुन अधिक प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु या एकाही प्रस्तावावर महानगरपालिकेने अद्याप विचार केलेला नाही. आम्ही केलेल्या सुचनांची अंमलबजावणी झाल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडीवर उपाययोजना होऊ शकते असा वाहतूक पोलीसांचा दावा आहे.