शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका निवडणूक : दुसऱ्या लाटेने इच्छुकांच्या आशेवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 09:57 IST

वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही.

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेचा बार एप्रिल महिन्यात उडण्याची शक्यता असतानाच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. निवडणूक लवकरच होईल, या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुक उमेदवारांची साफ निराशा झाली आहे, तसेच मोर्चेबांधणीसाठी सज्ज असलेल्या राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही निरुत्साहाचे वातावरण आहे.वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून, २०२० रोजीच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक अद्याप घोषित झालेली नाही. पालिकेची मुदत संपून आता ९ महिने पूर्ण होतील. मात्र, अजूनही पालिका निवडणुकीला विलंबाचा सूर लागतच चालला आहे. मध्यंतरी कोरोनाचा आलेख घसरल्यानंतर, पालिका निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा राजकीय मोर्चेबांधणीला जोर वाढला होता. प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर होऊन त्यावरील हरकती व सुनावणीही आता सुरू आहे. मात्र, मध्येच कोरोना पुन्हा टपकल्याने निवडणुकीवर पुन्हा संक्रांत ओढावली आहे. निवडणुकीसाठी हळदी समारंभ, सामाजिक उपक्रमांना इच्छुक उमेदवारांनी चांगला जोर वाढविला होता. संभावित उमेदवार व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यासाठी मोठा खर्चही  करण्यात आला होता. मात्र, या सर्व खर्चावर कोरोना प्रादुर्भावाने चादर ओढल्याने राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वसई-विरार शहर महानगरपालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक आणखी काही महिने दूर ढकलली गेली आहे. काही महिन्यांच्या फरकाने राजकीय पक्षांना तयारीसाठी वेळ मिळाला असला, तरी तयारी केलेल्या इच्छुकांची घालमेल मात्र वाढली आहे. 

गावांचा निकाल काय लागणार? पुढील ९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात होत असलेल्या २९ गावांच्या सुनावणीकडे आता वसईकरांचे लक्ष असणार आहे. सलग दोनदा सुनावणी पुढे ढकलून उच्च न्यायालयाने वसईकरांची हुरहूर वाढविली आहे. आता पुढील तारखेला वसई-विरार शहर महानगरपालिकेचा निकाल काय लागतो, त्याकडे वसईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. जोपर्यंत गावांच्या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीवर टांगती तलवार असणार आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक