शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

वसई-विरार महानगरपालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा होतो गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:02 IST

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग  कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

- आशीष राणेलोकमत न्यूज नेटवर्क वसई : वसई-विरार महापालिका हद्दीमधील शहरांत दररोज ६५० टन कचरा जमा होत असतो. महापालिकेच्या एकूण ९ प्रभागांतून हा कचरा नियमितपणे गोळा केला जातो. शहरांत कचरा संकलनासाठी ६ प्रकारची एकूण ६७२ वाहने कार्यरत आहेत. यामध्ये ११४ डीपर, ५७ कॉम्पॅक्टर, ६४ डम्पर, २० ट्रॅक्टर, २०८ ट्रायसिकल, २०९ हातगाडी यांचा समावेश आहे.

महापालिका हद्दीतील कचरा संकलन हे बहुतांश शहरी व ग्रामीण भागातून होत असते. यासाठी शासनाने बंधनकारक केल्यानुसार, २०१७ मध्ये पालिकेच्या विरारस्थित मुख्यालयात स्वच्छता व आयटी विभाग कार्यरत असून, या विभागांतील तज्ज्ञ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग शहरांतील संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर बसवलेल्या जीपीएस प्रणालीवर लक्ष ठेवून आहे.

ठेका आणि कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत वसई-विरार महानगरपालिका हद्दीमधील तीनही  शहरांत कचरा संकलन, त्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आदीसाठी स्वच्छता विभागात ठेका व कायमस्वरूपी असे एकूण ३ हजार ४१२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. महानगरपालिका हद्दीतील एकूण ९ प्रभागांत ५७ ठेका मुकादम तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. ते आपले काम चोखपणे बजावीत आहेत. 

या सर्व कचऱ्याचे विघटन आणि विल्हेवाट लावण्यासाठी सध्या तरी महानगरपालिका प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्थापन कंपनी वा प्रोजेक्ट कंपनी नाही. कचरा विल्हेवाट प्रोजेक्ट- बाबतीत महापालिकेच्या वतीने विविध राज्ये, देशांतर्गत किंवा देशाबाहेरील विघटन करणाऱ्या कंपन्या यांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत आम्ही अभ्यासही करीत आहोत. - गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणावसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. त्यावरूनच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.महापालिका हद्दीत दररोज ६५० टन कचरा गोळा होतो. वसई पूर्व गोखिवरे येथील डम्पिंग ग्राउंडवर हा कचरा टाकला जातो. पालिका हद्दीत केवळ एकच डम्पिंग ग्राउंड आहे. 

कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी वसई-विरार महापालिका हद्दीतील तीनही शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असतो. मात्र शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्याची समस्या मोठी असल्याने डम्पिंग ग्राऊंड असलेल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दम्यासारख्या श्वसनाच्या विकारांनी हे नागरिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे पालिकेेने कचऱ्याच्या समस्येवर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार