शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसईच्या बाजारात रानमेवा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:15 IST

जांभूळ, करवंद, आंबा : रासायनिक प्रक्रिया नसल्याने ग्राहकांची पसंती

पारोळ : आंबा अशा मोठ्या फळांबरोबर आपले अस्तित्व टिकवून ठेवलेला रानमेवा उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत दृष्टीस पडतो. या महिन्यात जांभूळ, राजन, करवंद, जाम वसईच्या बाजारात दाखल झाली असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रानमेवा बाजारात दाखल झाल्याने उन्हाच्या काहिलीपासून लोकांना दिलासा देण्यास पूरक ठरते आहे.

हजारो वर्षांपासून चालत आलेली रानमेव्याची परंपरा काळाच्या ओघात बदलत गेली असली तरी आदिवासी समाजात अन्नाचा घटक म्हणून मान्यता असलेल्या रानमेव्याचे महत्त्व कमी झालेले नाही. रानावनात अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करून राहिलेला आदिवासी समाज अनेक गोष्टींवर आपली उपजीविका चालवतात. त्यामुळे आदिवासींना हंगामी रोजगाराचे साधन उपलब्ध होते.

उन्हाळ्यात मध, करवंदे, गावठी आंबे, तोरणे, पायरी, पिंपळाची फळे, आवळा, रान फणस, ताडगोळे, भोकर, जाम, जांभळे गोळा करतात आणि बाजारात येऊन विकतात. वर्षांतून एकदाच आस्वाद घ्यायला मिळणारी ही फळे वसईच्या बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांचा रानमेव्याकडे चांगलाच कल दिसून येत आहे. सफरचंद, संत्री अशा फळावर सुखावणारे ग्राहक आता सध्या रानमेव्याची खरेदी करताना दिसत आहेत. खेडयापाडयातून आलेल्या महिला टोपल्यातून ही फळे विकायला बसलेल्या बाजारात दिसत आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाडयात ही फळे खूप लाभदायक ठरतात. वेगवेगळया रोगांवर ती गुणकारी मानली जातात. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळिंब, चिकू, केळी या फळांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रि या करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक असल्यामुळे रानमेव्याच्या रूपाने आरोग्यवर्धक पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे. आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या या रानमेव्याचा भाग असलेली करवंदे आदिवासी बांधवांना एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत साधारणपणे अडीच महिने रोजगार मिळवून देते.

भरपूर मागणीवसईच्या बाजारात १० रु पये एक वाटा या दराने ही करवंदे, जांभूळ विकली जातात. एका टोपलीत साधारणपणे ५० ते ६० वाटे असतात. त्यानुसार दिवसभरात ४५० ते ५०० रुपये त्यांना मिळत असल्याचेही रानमेवा विक्र ेत्या महिलांनी सांगितले. पाणीदार ताडगोळे शरीरातील उष्णता कमी करतात. त्यांनाही मागणी आहे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार