शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वसई - पनवेल मार्गावर लवकरच धावणार लोकल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:15 IST

वसई ते पनवेल लोकल चालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

वसई : वसई - दिवा मार्गावर आता वसई ते पनवेल लोकल चालवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.ही लोकल सेवा लवकरच सुरू व्हावी, यासाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल विकास प्राधिकरण) याबाबत तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभ्यास करून आपला अहवाल रेल्वेला सादर करणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच ही वसई - पनवेल लोकल गाडी धावू शकेल. यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीत याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे आता मुंबई रेल विकास प्राधिकरणाने ही लोकल चालवण्यासंदर्भात फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यास सुरु वात केली आहे.दरम्यान, सद्यस्थितीत वसई ते पनवेल या मार्गावर मेमू गाडी धावत असून वसई ते पनवेल हे अंतर पार करायला मेमू गाडी तब्बल दीड तास घेते. या दीड तासांच्या दरम्यान एकूण १४ स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर वसई रोड, जुचंद्र, कामण, खारबाव, भिवंडी, कोपर, डोंबिवली, दिवा (जं), दातिवली, निळजे, तळोजा, नावदे, कळंबोली आणि पनवेल अशी १४ स्थानके आहेत. पैकी तळोजा, भिवंडी, दातिवली, कळंबोली ही चार स्थानके महत्त्वाची आहेत. या मार्गावर लोकल चालवल्यास त्याचा मोठा फायदा येथील लोकसंख्येला होऊ शकतो. मात्र त्यासाठी या मार्गावर अनेक तांत्रिक बदल करावे लागणार आहेत.रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले असून या मार्गावर प्रवास करण्याऱ्यांना रेल्वेने सुखद धक्का दिल्याची प्रतिक्रि या प्रवाशांनी लोकमतला दिली.

टॅग्स :localलोकल