शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत वसई ६१ व्या स्थानी, आयुक्त म्हणाले आणखी प्रयत्न करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:34 IST

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले

वसई : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान दशातील ४७५ शहरात एकाच वेळी पाहणी करण्यात आली होती.दरम्यान मुंबई व ठाणे जवळील पालघर जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वसई विरार महापालिकेला एकूण ४ हजार गुणांपैकी २८०४ गुण मिळाले. यादीत राज्यातील एकूण २८ शहरात १०० शहरामध्ये वसई विरार मनपा बाराव्या क्र माकांवर राहिली असून १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४ हजार शहरामध्ये वसई विरार शहर हे ७ व्या स्थानावर आहे. विषेश म्हणजे या अभियानात वसईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.एकूण अभियान पाहणीतही वसई विरार शहर अव्वल ठरले. मात्र, सेवास्तरात ५९१ इतके कमी गुण पडल्याने शहराचा क्र मांक थोडा मागे गेला. तरीही, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी सुधारणा झालीआहे.सेवा स्तर प्रक्रि येत केवळ ५९१ गुण मिळालेदेशात इंदूर, भोपाळ, चंदीगढ ही शहरे पहिल्या तीन स्थानावर आहेत. राज्यात नवी मुंबई सर्वाेत्कृष्ट ठरली. तर एकूण गुणांकनाचा विचार करता वसई विरार शहराला सेवा स्तर प्रक्रि येत एकूण १४०० गुणांपैकी केवळ ५९१ गुण मिळाले. अभियानाच्या पथकाकडून थेट पाहणी वर्गातील एकूण १२०० गुणांपैकी शहराला १०३८ गुण मिळाले.नागरिक प्रतिसाद गटातही एकूण १४०० पैकी शहराच्या खात्यात ११७५ गुण जमा झाले.गंभीर म्हणजे शहरात निघणाºया घनकचरा व्यवस्थापनाच्या गैरसोयीचा फटकाही शहराला सोसावा लागला. प्रशासनाने मागील वर्ष भरापासून वेगाने कामास सुरूवात केली. मोबाईल अ‍ॅप तयार करून काही नाविन्यपुर्ण कल्पनाही आणल्या. यामुळे क्र मांक व गुणातही सुधारणा झाली. पुढल्या वर्षी पुन्हा यात मोठी सुधारणा होऊन वसई विरार हे शहर देशात वरच्या क्र मांकावर जाईल, अशी अपेक्षा आयुक्त सतिश लोखंडे यांनी व्यक्त केली.